Lychee Benefits: आरोग्य आणि सौंदर्यासाठी अतिशय फायदेशीर आहे लीची, जाणून घ्या इतर फायदे

Lychee: विविध पोषकतत्त्वे युक्त लीची आपली त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. वजन कमी करण्यापासून तर संक्रमणावरील उपचारापर्यंत हे रसाळ फळ कुठल्याही सुपरफूड पेक्षा कमी नाहीय. जाणून घ्या याचे फायदे...

Benefits of Lychee
आरोग्य आणि सौंदर्यासाठी अतिशय फायदेशीर आहे लीची 

थोडं पण कामाचं

 • त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे लीची.
 • रसाळ फळ असलेल्या लीचीचे अनेक फायदे, जाणून घ्या.
 • चमकत्या आणि तजेलदार त्वचेसाठी असा करा लीचीचा वापर

मुंबई: मॉन्सून आल्यानंतर लोकांना रणरणत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. यावेळी मान्सून (Monsoon) लवकर दाखल झालाय. या सिझनमध्ये अनेक असे फळं मिळतात, जे खाऊन आपण पावसाळ्यात पण हेल्दी राहू शकतो. यापैकीच एक फळ म्हणजे लीची. (Lychee) लीची खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे. लीची हे रसाळ फळ (Fruit) भारतातील अनेक भागांमध्ये उगवलं जातं. या फळात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. जे हेल्दी लाईफसाठी अनेक प्रकारानं फायदेशीर (Benefits) ठरतात. तर सौंदर्याशी निगडितही अनेक फायदे यातून मिळतात.

जाणून घेऊया लीचीमुळे होणाऱ्या फायद्यांबाबत...

 • लीची व्हिटॅमिन सी आणि एस्कॉर्बिक अॅसिडनं (एबीए) समृद्ध आहे. जे आपल्या शरीरातील इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतं. व्हिटॅमिन सी व्हाईट ब्लड सेलचं उत्पादन वाढवतं आणि शरीराला आजारांशी लढण्याचं बळ देतं.
 • लीचीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि फायबर असतं, जे पोटाचे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि पचनशक्ती वाढवतात.
 • लीचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुण असतात, जे पेशींची अधिकची वाढ थांबवतात, ज्यामुळे मोतियाबिंदू सारखे आजार उद्भवत नाहीत.
 • लीचीमध्ये अँटी-व्हायरल गुण इन्फ्लूएंजा आणि संक्रमणाविरोधात लढण्याचं काम  करतात.
 • हे कमी कॅलरी असणारं फळ आहे, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. आपण अनहेल्दी स्नॅक्स खाण्याऐवजी लीचीचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता.
 • आयरन सोबत कॉपर रेड ब्लड सेल वाढविण्याचं काम लीची करतं. लीची कॉपरमध्ये समृद्ध आहे आणि ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
 • लीचीमध्ये पोटॅशिअम आणि सोडियम भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. तसंच यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते.
 • लीचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, जे फ्री रेडिक्लसाला त्वचेचं नुकसान करण्यापासून रोखतात. यासोबतच वाढत्या वयामुळे होणाऱ्या समस्या पण थांबविण्याचं काम लीची करते.
 • लीची कॉपरचं एक मोठं स्रोत आहे, जे केसांना मुळापासून उत्तेजित करण्यात मदत करतं. त्यामुळे केसांची वाढ होते. हे व्हिटॅमिन सीनं समृद्ध आहे, त्यामुळे चमकदार आणि सुंदर केस तयार होण्यास मदत करतात.
 • त्वचेसाठी असा वापर करा लीचीचा

जर आपली त्वचा ऑईली आहे आणि पिंपल्समुळे आपण त्रस्त असाल तर लीचीचा फेस पॅक तयार करावा. हा फेस पॅक लावल्यानं त्वचेचं पिंग्मेंटेशन दूर होतं. यासाठी लीचीच्या ज्यूस सोबत गुलाब जल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळानंतर जेव्हा ते कोरडं होईल तेव्हा स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवावा आणि एक चांगलं मॉश्चरायझर लावावं. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा जरूर वापरा.

याशिवाय लीचीचा रस चेहऱ्यावर लावल्यानं आपल्याला उन्हामुळे होणाऱ्या काळपटपणापासून सुटका मिळते. यात व्हिटॅमिन ई असतं, जे त्वचेसाठी खूप चांगलं ठरतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी