Milk and Dry Dates: दुधात खारीक उकळून प्यायल्याने होतात खूप फायदे, जाणून घ्या

तब्येत पाणी
Updated Jun 04, 2020 | 21:43 IST | टाइम्स नाऊ हिंदी

खजूर वाळवून तयार होणारं अनेक गुणयुक्त असलेला सुका मेवा म्हणजे खारीक. अनेक आजारांपासून आपल्याला खारीकमुळे मुक्तता मिळते. एव्हढंच नव्हे तर दुधासोबत खारीक खाल्ल्यानं त्याचे गुण अधिक वाढतात. जाणून घ्या...

Milk and Dry dates
खारीक दुधात उकळून प्यायल्यानं होतात 'हे' फायदे 

थोडं पण कामाचं

  • खारीकमध्ये खूप पोषकतत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत
  • दुधासोबत खारीक उकळून प्यायली, तर त्याचे गुण अधिक वाढतात
  • अनेक आजारांवरील उपाय आहे खारीक-दुधात सामावलेले

Dry Dates: खारीक एक सुका मेवा आहे, जो खजूर वाळवून बनवलं जातं. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, आयरन, झिंक, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्त्वं असतात, जे अनेक आजारांपासून आपला बचाव करतात. दररोज खारकेचं सेवन केल्यानं लैंगिक दुर्बलता दूर होते आणि शरीर सशक्त होतं. खारीकेचा वापर अनेकदा आपण एखादी रेसिपी आकर्षित करण्यासाठी आणि त्याची चव वाढविण्यासाठी करतो. मात्र आपल्याला माहितीय का? डाएटमध्ये जर खारीक वापरली तर शारीरिक अशक्तपणा दूर होते. विशेष करून जर आपण दुधासोबत मिसळून खारीक खाल्ली तर याचे गुण अधिक वाढतात.

डॉक्टर नेहमी कुठलाही आजार बरा करण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. यासोबतच ते काही खाद्यपदार्थांचं सेवन करायला सांगतात, जे आजार बरा करण्यात मदत करणारे ठरतात. दररोज दुधात खारीक उकळून ते प्यायलं तर त्याचे कमालीचे फायदे होतात. अनेक आजार दूर करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खारीक घालून उकळलेलं दूध फायदेशीर ठरतं.

खारीक आणि दुधात लपले आहेत अनेक आजारांवरील उपाय

हाडं मजबूत होतात – खारीक आणि दूध दोन्हींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं, अशातच या दोन्हींचं एकत्र सेवन केलं तर हाडं मजबूत होतात. जेव्हा आपले हाडं मजबूत असतात तेव्हा आर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस किंवा हाडांशी निगडित कुठल्याही आजारापासून आपण दूर राहतो.

हेल्दी पोटासाठी खारीक आहे वरदान – खारीकेत पोटॅशिअम आणि फायबर असतात त्यामुळे, जेवण सहजपणे पचतं. तर दूध पचनक्रियेत उपयुक्त असे एन्जाइम्स वाढवतं. दररोज याचं सेवन केल्यानंतर बद्धकोष्ठता, पोटदुखी सारख्या समस्या होत नाही.

वजन वाढविण्यासाठी – जर आपल्याला वजन वाढवायचं आहे तर खारीक आणि दूध एकत्र अवश्य घ्यावं. खजूर पेक्षा अधिक कॅलरी खारीकेत असतात. जर याला दुधासोबत घेतलं, तर आपण बारीक राहणार नाही. डाएटमध्ये याचा समावेश केल्यानंतर १ महिन्यात आपल्याला वजनातील फरक जाणवेल.

शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी – डायबिटीज असलेल्या रुग्णांना काही पदार्थ खाण्यावर बंधणं असतात. मात्र जर आपण खारीक खाल्ली तर शरीरातील साखरेचं प्रमाण योग्य राहिल. हेच कारण आहे की, डायबिटीजच्या रुग्णांना खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. दुधासोबत खारीक खाणं अतिशय फायदेशीर ठरतं.

दात राहतील मजबूत – दुधासोबत खारीकेचं सेवन केल्यानंतर दातही मजबूत राहतात. कारण यात कॅल्शिअम आहे. त्यामुळे दातांना मजबूत बनवतं.

त्वचा आणि केसही सुदृढ बनवतात – खारीक पावडर दुधात मिसळून खाल्ल्यानं त्वचा चमकदार होते. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता दूर करून रक्तप्रवाह चांगला ठेवण्यास मदत होते. याशिवाय जर आपले केस गळत असतील तर ही समस्या पण दूध-खारीकनं दूर होतं.

(डिस्क्लेमर: वरील आर्टिकलमध्ये दिलेल्या टीप्स ही सामान्य माहिती आहे, याचा वापर करण्यासपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी