Hair Care: केसांना लावा अंड्याचं मास्क, दाट होण्यासोबत झपाट्यानं वाढतील केस

डोक्यावरील केसांना अंड्याचं मास्क लावल्यानं केसांसाठी ते अतिशय फायदेशीर ठरतं. अंड फक्त आपल्या आरोग्यसाठीच नाही तर केसांच्या आणि त्त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.

Egg Hair Mast (Source-Pixabay)
जाणून घ्या घनदाट आणि लांब केसांसाठी काय करावेत उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • केसांच्या वाढीसाठी खास अंड्याचे मास्क, सुदृढ केसांसोबतच त्याची वाढही होते झपाट्यानं
  • अंड केसांना चांगलं नरिश करतं.
  • अंड्यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, जे आपल्या आरोग्यासोबत केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात

Hair Care: केसांच्या आरोग्यासाठी त्यात अंडे लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात, जे आपल्या आरोग्यासोबतच केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. अंड आपल्या केसांना नैसर्गिक पद्धतीनं मॉइश्चराईज करतं आणि केसांना हेल्दी ठेवतं.

अंड्यामुळे केसांचं तुटणं पण थांबवतं सोबतच केसांची चांगली वाढ होते, ते ही झपाट्यानं. अंडी केसांना मूळापासून कंडिशनिंग करतं, ज्यामुळे केस झपाट्यानं वाढतात. अंड्याचं मास्क केसांशी निगडित सर्व समस्यांना मूळापासून संपवतं आणि केस बळकट होतात.

अंडे, एलोव्हेरा आणि ऑलिव्ह ऑईलचं मास्क

एलोव्हेरा केसांना स्ट्रेट करण्यासाठी ओळखलं जातं. ऑलिव्ह ऑईल केसांना ट्रिम करतं आणि सोबतच निस्तेज केसांमध्ये जीव आणतो. यासाठी एका भांड्यात २-३ चमचे अंड्याचा पांढरा भाग, ४-५ चमचे एलोव्हेरा जेल, २-३ चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या आणि ते कोमट करा. हे सर्व मिश्रण मिक्स करून ते केसांना मूळापर्यंत लावावं. लावल्यानंतर अर्धा तास ते तसंच सोडून द्यावं आणि यानंतर स्वच्छ थंड पाण्यानं केस धुवावेत.

अंड, केळ आणि मध

अंडे जिथं केसांना चांगल्या पद्धतीनं नरिश करतं तसंच त्यासोबत जर केळ आणि मध मिसळून ते केसांना लावलं तर केस अधिक मॉइश्चराईज होतात. ऑलिव्ह ऑईल आणि दूध दोन्ही आपल्या केसांना मजबूत करतात आणि केसांना तेज प्रदान करतात. यासाठी एक अंडा, एक स्मॅश केलेलं केळ, २ चमचे दूध, तीन चमचे मध आणि ५ चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. या सर्व वस्तू एका वाटीत चांगल्या पद्धतीनं मिसळून घ्या. आता हा मास्क आपल्या केसांना मूळापर्यंत नीट लावा. एक तास ठेवून केसांना शॅम्पू करून घ्यावं.

अंडा, नारळ आणि बदाम तेलाचं मास्क

नारळाचं तेल आणि बदाम तेल आपल्या कोरड्या केसांमध्ये जीव आणतो आणि यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. मास्क बनविण्यासाठी ४-५ चमचे दूध, ३-४ चमचे अंड्याचा पांढरा भाग, १-२ चमचे नारळाचं तेल घेऊन हे सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर हे मिश्रण आपल्या केसांना मूळापर्यंत लावून घ्यावं. अर्धा तास ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्यानं केस धुवून घ्यावेत. लक्षात ठेवा की, कंडीशनर लावू नये. आपण ही प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.

अंडी आणि दह्याचं मास्क

जर आपले केस झपाट्यानं झडत असतील तर आपल्यासाठी हे मास्क खूप फायदेशीर आहे. यामुळे डँड्रफ पण कमी होतो. यासाठी १ अंड, ३-४ चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करावा. हे सर्व मिक्स्ड केल्यानंतर खूप व्यवस्थितपणे आपल्या केसांना हे मास्क लावावं. १ तास ते तसंच ठेवून मग केस छान शँम्पू करावेत.

(डिस्केमर: वरील सल्ला आणि टिप्स ही सामान्य माहितीच्या आधारे दिलेली आहे, याचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी