Monsoon Hacks: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ खास गोष्टी

Monsoon: पावसाळ्यात किडे, मुंगळे अधिक एक्टिव्ह होतात. घरापासून तर आपल्या आरोग्यापर्यंत ते आपल्यासाठी संकट बनू शकतात. पावसाळा आता सुरू झालाय तेव्हा जाणून घ्या कसा दूर राहायचं या किड्या-मुंगळ्यांपासून...

Monsoon Hacks
पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी 

थोडं पण कामाचं

  • पावसाळ्यात घराघरात किडे, मुंगळे, माशा आणि डासांचा त्रास अधिक वाढतो.
  • पाणी जमा झाल्यानं डास आणि माशा मोठ्या प्रमाणात वाढतात.
  • पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार यामुळे बळावत असतात.

अखेर पावसाळा सुरू झालेला आहे. यासोबत उन्हामुळे होणारी काहिली आता बंद व्हायला सुरूवात झालीय. पावसाच्या पहिल्या सरी जितका आनंद देतात, तितकाच वाढत जाणाऱ्या पावसाचे साईड इफेक्ट आपल्याला सहन करावे लागतात. मॉन्सूनमध्ये पावसामुळे त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात, तसंच पावसाळी किडे, मुंगळे, कॉक्रोच, मुंग्या, माशा आणि डासांचंही संकट वाढतं.

आपण जर या सर्वांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडू लागतो आणि आपण आजारी पडतो. म्हणून नेहमीच असा सल्ला दिला जातो की, पावसाळ्यात स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीनं पाळली पाहिजे. स्वच्छ आणि कोरडे कपडे घालावेत आणि ताजं अन्न ग्रहण करावं. यासोबत घरंही नेहमी व्यवस्थित स्वच्छ करत राहावं. कारण पावसाळ्यात घराच्या कानाकोपऱ्यात फंगस लागण्याची भिती असते.

कॉक्रोच घरातून असे घालवावे

स्वयंपाक घरामध्ये ज्याचा सर्वात अधिक त्रास होतो तो म्हणजे कॉक्रोच. पावसाळ्यात प्रत्येक ठिकाणी आर्द्रता असते त्यामुळे किचनच्या वॉशबेसिनमध्ये किचन स्लॅबमध्ये प्रत्येक ठिकाणी कॉक्रोच वावरतांना दिसतात. जे आपल्यासोबत अनेक आजार घेऊन फिरत असतात. यामुळे ताप, दमा इत्यादींचं संकट वाढत जातं.

यापासून सुटका करून घेण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे आपल्या वॉशबेसिनमध्ये २ ते ३ फिनाईलच्या गोळ्या टाकून ठेवाव्यात यामुळे इथं कॉक्रोच येणार नाहीत. याच पद्धतीनं मायक्रोव्हेव, गॅसची शेगडी किंवा इलेक्ट्रॉनिक अव्हनच्या मागे नेफ्थलीन म्हणजे डांबराच्या गोळ्या टाकून ठेवाव्यात. याशिवाय भांडे आणि डाळ-तांदुळाच्या डब्यांजवळ एक-दोन डांबराच्या गोळ्या टाकाव्यात.

माशी आणि डासांपासून असं वाचावं

पावसाळ्यात माशी, डासांचा खूप त्रास होतो. कचाऱ्याच्या डब्याजवळ किंवा नालीजवळ माशा आणि डास अधिक प्रमाणात असतात. पावसाळ्यात अशा जागांवर डीडीटी टाकावं. याशिवाय जेव्हा पण आपण जमीनीवर पोछा मारायचा असेल तेव्हा त्यात फिनाईल किंवा तुरटीचा तुकडा टाकून पोछा करावा.

डास चावण्यापासून स्वत:चा बचाव करायला हवा. त्यासाठी रात्री मच्छरदानी लावून झोपावं. याशिवाय खोलीत डासांचा उच्छाद कमी करण्यासाठी कडूलिंबाची पानं, कापूर याचा धूर करावा. कूलर वापरत असाल तर त्यातील पाणी दररोज बदलावं. घरात कुठल्याही भागात पाणी साचून राहू देऊ नये. ड्रेनेज सिस्टम वेळोवेळी चेक करावं आणि स्वच्छ ठेवावं. खोलीत मोरपंथ लावला तर पाल येणार नाही.

वाळवी लागण्यापासून असं वाचवा

पावसाळ्यात एकीकडे खोलीत भींतीत आणि रॅकमध्ये ओलावा असतो, अशावेळी तिथं झपाट्यानं फंगस लागयला लागते किंवा वाळवी आपलं घर बनवू लागते. रॅकमध्ये वाळवी लागली तर आपले सर्व पुस्तकं, कपडे सर्वांनाच नुकसानकारक ठरते.

वाळवीपासून सुटका करून घेण्यासाठी वेळोवेळी रॅक वाळवत राहा. ती चेक करत राहा. कपडे आणि पुस्तकांची स्वच्छता ठेवा आणि त्याची जागा बदलत राहा. बचाव करण्यासाठी पुस्तकं आणि कागदांमध्ये वाळलेले कडुलिंबाच्या पानांची लहान फांदी यात ठेवा. याशिवाय पुस्तकांचं वाळवीपासून रक्षण करण्यासाठी रॅक डब्बा खडा चुना शिंपडावा. चुन्यामुळे वाळवी असल्यास ती मरून जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी