मुंबई: दरवर्षी २५ मार्च हा दिवस वर्ल्ड थॉयरॉईड अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी थायरॉईड आजार, त्याची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपचार आणि इलाजाबाबत जागरूकता वाढवण्याचे काम केले जाते. त्यामुळे अधिकाधिका लोकांपर्यंत या आजाराविषयी माहिती मिळेल. २००८मध्ये युरोपियन थायरॉईड असोसिएनच्या प्रस्तावानंतर हा दिवस साजरा केला जातो. पब्लिक हेल्थ अपडेटच्या एका रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर सध्या २०० मिलियनहून अधिक लोक थायरॉईडने ग्रस्त आहेत. यातील ५० टक्के केसेस अशा आहेत ज्यांचे निदान होत नाही.
अधिक वाचा - कोरोना प्रतिबंधक लसचे २० कोटी डोस नष्ट करणार
खरंतर, गळ्याजवळ फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी थायरॉईड ग्रंथी म्हणून ओळखली जाते. ही शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथीपैकी एक आहे. या ग्रंथी हार्मोन निर्माण करतात. ज्यामुळे शरीराचे गरजेच्या फंक्शनवर परिणाम करतात तसेच मेटाबॉलिज्म रेग्युलेट करतात. थायरॉईड आजारामध्ये सामान्य प्रकारामध्ये हायपोथायरॉईडज्म, हायपरथायरॉईडज्म, थायरायडिटिस आणि थायरॉईड कॅन्सरचा समावेश होतो.
सप्टेंबर २००७मध्ये युरोपियन थायरॉईड असोसिएशन काँग्रेसच्या पहिल्या एका वार्षिक सामान्य बैठकीदरम्यान २५ मेला अधिकृतरित्या वर्ल्ड थायरॉईड डेच्या रूपात सुरू करण्यात आला होता.
या वर्षी वर्ल्ड थायरॉईड डेसाठी कोणतीही वेगळी थीम नाही. दरम्यान, २२ ते २८ मे दरम्यान साजरा केला जाणाऱ्या थायरॉईड जागरूकता आठवड्यासाठी थायरॉईड फेडरेशन इंटरनॅशनलने थीमची घोषणा केली आहे की इट्स नॉट यू. हा तुमचा थायरॉईड आहे. यामुळे लोकांपर्यंत या आजाराविषयी माहिती पोहोचेल.
अधिक वाचा - डोळ्यांखाली येतात काळी वर्तुळं, मग करा ३ योगासनं
दरम्यान, थायरॉईड आजाराची सुरूवातीची लक्षणे धोकादायक दिसत नाहीत मात्र यावर लक्ष दिले नाही तर ते अधिक समस्या निर्माण करू शकतात. वर्ल्ड थायरॉईड डेचा उद्देष लोकांना याबाबतची लक्षणे माहिती करून देणे तसेच थायरॉईडवरील उपचार वाढवणे असे आहे.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.