Fruits for weight loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? ही फळं खाल्ली तर लवकर मिळेल फळ

ज्यांना वजन वेगाने कमी करण्याची इच्छा आहे, त्यांना आहारात फळांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांमुळे वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Fruits for weight loss
वजन कमी करण्यासाठी ही फळं आहेत फायदेशीर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी फळे ठरतात गुणकारी
  • फायबर आणि व्हिटॅमिनमुळे वजन कमी होण्यास मदत
  • कॅलरी कमी असल्यामुळे वजन राहते नियंत्रणात

Fruits for weight loss | सध्याची व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याचा त्रास अनेकांना होतो. भारतात सध्या बहुतांश मध्यमवर्ग हा वजन वाढण्याच्या समस्येमुळे चिंताग्रस्त आहे आणि ते कमी कसं करता येईल, याची काळजी करत आहे. त्यासाठी अनेकजण जिम लावतात, डाएटिशनकडे जाऊन आपल्यासाठी योग्य आहार लिहून आणतात आणि इतरही अनेक प्रकाराने प्रयत्न करतात. या सर्व प्रयत्नांच्या जोडीला जर आहारात चांगल्या फळांचा समावेश केला, तर त्याचे योग्य परिणाम आपल्याला दिसू शकतात. फळांमध्ये व्हिटॅमिन, फायबर यासह अनेक पोषक घटक असतात, जे आपलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जाणून घेऊया, वजन कमी करण्यासाठी कुठली फळं फायदेशीर ठरतात, याविषयी.

सफरचंद

ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करण्याची गरज आहे. सफरचंदात कमी कॅलरीज असतात आणि अधिक प्रमाणात मिनरल्स, प्रोटीन, अँटि ऑक्सिडंट्स् आणि फायबर असतं. सफरचंद खाण्यामुळे पचनशक्तीही सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

कलिंगड

जर तुम्हाला वजन कमी करायचंच असेल, तर कलिंगडासारखं दुसरं उपयुक्त फळ मिळणं कठीण आहे. कलिंगडात मोठ्या प्रमाणावर पाणी तर असतंच, त्याचबरोबर फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटिन, लायकोपीन यासारखे अनेक पोषक घटक असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कलिंगडाचं ज्यूस पिणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. त्याचप्रमाणे कलिंगड कापून खाणे हा पोट भरण्याचा आणि शरीरात कमीत कमी कॅलरीज सोडण्याचा उत्तम मार्ग ठरतो. 

अधिक वाचा - Ear infection in Monsoon : पावसाळ्यातील कानातील इन्फेक्शन का वाढते? पाहा कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

पपई

वजन कमी करण्यासाठी पपई फारच गुणकारी मानली जाते. पपईत फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं.यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरात साठलेली चरबी वितळायलाही त्याची मदत होते. आपल्या डाएटमध्ये अधूनमधून पपईचा समावेश केला तर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लवकर यश येण्याची शक्यता असते.

अधिक वाचा - Plastic Surgery And Cosmetic Surgery: प्लॅस्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरीमधील फरक तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या फरक

बेरी

बाजारात पाच वेगवेगळ्या प्रकारच्या बेरिज मिळतात. आपल्या जवळच्या बाजारात मिळणाऱ्या बेरिज आणून त्यांचं सेवन केल्यामुळेही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना वेगाने यश येऊ शकतं. बेरिजचं नियमित सेवन केल्यामुळे हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, जळजळ यासारख्या त्रासांपासूनही सुटका होते. त्याचप्रमाणे यात मुबलक प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. 

थोडक्यात, त्या त्या ऋतुंमध्ये बाजारात मिळणाऱ्या फळांचा आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे. या फळांमध्ये अनेक पोषक गुण तर असतातच, शिवाय कॅलरी कमी असल्यामुळे वजन घटायला त्यांची मदत होते.

अर्थात, हे सर्व घरगुती आणि सामान्य उपाय आहेत. तुम्हाला वजनासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी