तुम्ही देखील नकली चहा पावडरचा आस्वाद घेत आहात का? या सोप्या ट्रिकद्वारे ओळखा खऱ्या आणि खोट्याचा फरक

तब्येत पाणी
Updated Mar 29, 2023 | 14:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tea Leaves Check Real or Fake : चहा एक देसी पैय आहे, जे प्रत्येक घरात अनेकदा बनवली जाते. पण जरा विचार करा, की हा चहा तुम्ही जो आस्वाद घेऊन पित आहात, त्यात पडणारी चहा पावडर नकली किंवा बनावटी निघाली तर तुम्ही काय करणार? बाजारामध्ये मागील अनेक वर्ष भेसळयुक्त आणि नकली पावडर विकली जात आहे. 

चहा ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या देशात सकाळच्या वेळी खूप ठिकाणी बनवण्यात येते
चहा पावडर खरी आहे की भेसळयुक्त आहेत याबद्दल खात्री करून घेऊ शकता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भेसळयुक्त किंवा नकली चहा पावडरला घेऊन आज देशातला कॉमन मेन सर्वात जास्त त्रस्त आहे
  • अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते
  • भेसळयुक्त आणि नकली पदार्थांच्या सेवनाने काही नुकसान झाले तर? हा प्रश्न देखील त्याला मोठ्याप्रमाणात सतावतो. 

How To check Real And Fake भेसळयुक्त किंवा नकली चहा पावडरला घेऊन आज देशातला कॉमन मेन सर्वात जास्त त्रस्त आहे. मी दुकानातून खरेदी केलेल्या वस्तु खऱ्या आहेत की खोट्या आहेत हेच कॉमन मेन ला कळत नाही. शिवाय, भेसळयुक्त आणि नकली पदार्थांच्या सेवनाने काही नुकसान झाले तर? हा प्रश्न देखील त्याला मोठ्याप्रमाणात सतावतो.  Know how to Recognized Tea Leaves heck real or fake

चहा ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या देशात सकाळच्या वेळी खूप ठिकाणी बनवण्यात येते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. पण ही चहा नकली किंवा बनावटी चहापावडरपासून बनवली असेल तर तुम्ही काय करणार, याचा विचार कधी केला का? बाजारात मागील अनेक वर्षापासून भेसळयुक्त चहापावडर आणि नकली चहापावडर विकण्याचे रॅकेट फिरत आहे.

अधिक वाचा : ब्रेकफास्टमध्ये खा 'हे' 6 प्रथिनेयुक्त पदार्थ

अगदी हुबेहूब चहापावडर सारखी दिसणारी ही गोष्ट मूळ उत्पादनाच्या किमतीवर खरेदी करून आपण घरी घेऊन येतो, आणि त्याचा आहारात समावेश करतो. याच विषयाला घेऊन आम्ही तुम्हाला चहापावडर असली आहे की नकली या मधील फरक कसा ओळखायचा याबद्दल सांगणार आहोत. 

  • चहा ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला प्रथम एका ग्लास सामान्य पाण्यात एक चमचा चहाची पावडर टाकावी लागेल. जर चहापावडर खरी असेल तर ग्लासमधील पाण्याच्या रंगात काहीच बदल होणार नाही. दुसरीकडे, चहापावडरमध्ये जर रंग टाकला असेल तर पाण्याचा रंग देखील लाल होतो.
  • आपण चुंबकाच्या माध्यमातूनही असली आणि नकली चहा पावडर ओळखू शकतो. सर्वात आधी एका काचेच्या डिशमध्ये तुम्हाला चहापावडर पसरून ठेवायची आहे. आणि त्याच्यावरून हळूच चुंबक फिरवायचे. जर चहापावडर असली असेल तर ती चुंबकला चिटकणार नाही, पण जर ती नकली असेल तर नक्की चिटकेल. 

अधिक वाचा : आयुर्वेदिक वनस्पतींच्या वापराने खराब कोलेस्ट्रॉल होईल कमी

  • लिंबुच्या मदतीने देखील असली आणि बनवटी चहा पावडरमधील फरक आपण जाणू शकतो. साठी सर्वप्रथम काचेच्या भांड्यात लिंबाचा रस टाकावा. आता लिंबाच्या रसामध्ये चहाच्या पानांचे काही दाणे मिसळा. जर चहाची पावडर खरी असेल तर लिंबाचा रस पिवळा किंवा हिरवा होईल. दुसरीकडे, जर लिंबाचा रस केशरी किंवा अन्य रंगाचा झाला तर समजा की चहा पावडरमध्ये भेसळ झाली आहे.    

वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्याकडे वापरात असलेली चहा पावडर खरी आहे की भेसळयुक्त आहेत याबद्दल खात्री करून घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी