ही औषधी वनस्पती करते मधुमेहापासून झटक्यात सुटका

तब्येत पाणी
Updated Mar 18, 2023 | 18:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mulethi Reduced Blood Sugar Instantly: आयुर्वेदात अश्या काही औषधी वनस्पति उपलब्ध आहेत ज्यांचा अनेक मोठ्या आजारांवर उपचार म्हणून वापर केला जाऊ शकतो, आता विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अनेक झाडी झुडपांमध्ये अनेक गंभीर आजारांविरुद्ध गुणधर्म दडलेले आहेत. मूळेठी उर्फ ज्येष्ठमध हे झुडुप वनस्पती त्यातले एक जीवंत उदाहरण आहे. 

मधुमेहाच्या रुग्णांना लिकोरिस टी चा पिण्याचा सल्ला दिला जातो
यात एमोरफ्रुटिन्स नावाचा घटक असतो, जो मधुमेहाविरुद्ध उपचारासाठी महत्वाचे आहे.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुळेठी (ज्येष्ठमध) औषधी वनस्पतीची चव साखरेपेक्षा गोड आहे, मुळेठीचा चहा मधुमेहिंसाठी उपयुक्त मानला जातो. 
  • यात एमोरफ्रुटिन्स नावाचा घटक असतो, जो मधुमेहाविरुद्ध उपचारासाठी महत्वाचे आहे.
  • घश्यात खवखव होत असल्यास सुपरीच्या पानासोबत ज्येष्ठमध (मुळेठी ) वापरले जाते.

Mulethi Reduced Blood Sugar Instantly: मधुमेह ही एक क्लिष्ट समस्या झाली आहे. ज्यामध्ये हृदय, रक्त दाब, यकृत, डोळे यासंबंधीत आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात जवळपास ४२.२ कोटी लोक मधुमेहाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. यातील जवळपास १५ लाख लोकं दरवर्षी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मधुमेहाच्या समस्यांनी  मृत्यूमुखी पडतात. आपल्या देशामध्ये याचे प्रमाण खूप असून आजच्या काळात ८ कोटी भारतीय मधुमेहग्रस्त आहेत. त्या अनुक्रमे  २०४५ पर्यंत भारतामध्ये १३ कोटींहून अधिक लोक मधुमेही असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हे पण वाचा : Lebanon Crisis : मध्य-पूर्वेच्या 'पॅरिस'मध्ये आर्थिक संकट; लेबनन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

मधुमेह सध्याचे बैठी जीवनमान आणि चुकीच्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे होतो. त्यामुळे या दोन गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास मधुमेहाला मूळापासून नष्ट करणे शक्य आहे. मुळेठी ही अशी औषधी वनस्पती आहे, जी तुम्हाला मधुमेह पासून सुटका करून देण्यास मदत करू शकते. कारण रक्तातील साखर जलद नियंत्रणात आणण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असल्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. 

मुळेठीची संपूर्ण माहिती
जगभरात उपचारात्मक हेतूंसाठी सर्वात सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पतींपैकी एक म्हणजे मुळेठी. ह्या वनस्पतीच्या देठांचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. भारतातील अनेक भागांमध्ये या वनस्पतीची देट वाळवले जातात आणि त्याचा वापर औषधांसाठी केला जातो,  घश्यात खवखव होत असल्यास सुपरीच्या पानासोबत ज्येष्ठमध (मुळेठी ) वापरले जाते. ज्येष्ठमध साखरेपेक्षा खूप गोड आहे, म्हणून गोड पदार्थात त्याचा साखरेएवजी वापर केला जाऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना लिकोरिस टी चा पिण्याचा सल्ला दिला जातो. 

हे पण वाचा : या देशात खातात सगळ्यात लांब चपाती !

रक्तातील साखर नियंत्रणात येते  
अमेरिकेच्या माधुमेही संघटनेच्या जाहीर माहितीनुसार ज्येष्ठमध (मुळेठी ) मध्ये  एमोरफ्रूटिंस (amorfrutins) नामक घटक आहे, जे एंटी-डायबेटिक गुणधर्माने परिपूर्ण आहे. यात एमोरफ्रूटिंस एंटी-इंफ्लामेटरी चे घटकदेखील आहे, ज्याद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात येते. याच संदर्भातील एका अभ्यासानुसार मुळेठी म्हणजेच ज्येष्ठमधात कैक प्रकारचे अँटीऑक्सिडंट उपलब्ध आहेत, जे मेटोबोलिक सिंड्रोम च्या समस्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. यात असेही सांगण्यात आले आहे कि, ज्येष्ठमधाची छोटी मात्रा साखरेची लालसा दूर करते. म्हणजेच ज्येष्ठमध कमी प्रमाणात सेवन केल्यास गोड खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे गोड पदार्थ खावेसे वाटले तर त्यात स्वीटनरऐवजी मुळेठीचा देखील वापर करता येऊ शकते.  लिकोरिस चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला मानला जातो.

हे पण वाचा : ​अखेर खलिस्तान समर्थक Amritpal Singh अटकेत, 8 जिल्ह्यांचे पोलीस करत होते पाठलाग

पोटाचा अल्सर बरा करते 
न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर त्यांनी मुळेठीच्या गुणधर्माबद्दल सांगितले आहे. मूळेठीमध्ये कैक औषधीय गुणधर्म आहेत. ही वनस्पती अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे, ह्याचा थंड प्रभाव पडतो. लिकोरिसमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय पोटातील अल्सर, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि बॅक्टेरियाचे संक्रमण दूर करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी