Roti Maker Disadvantages: काही लोक तव्याऐवजी थेट गॅसवर चपाती बेक करायला लागतात. गॅसवर भाजल्यानंतर खायला खुसखुशीत लागते, एक ऐवजी दोन चपाती खाल्ल्या जातात. म्हणूनच बहुतेक गृहिणी चपाती बनवण्याची ही पद्धत अवलंबतात. पण ही चव काही वेळा आरोग्यावर भारी पडू शकते. अशा प्रकारे चपाती बेक केल्याने शरीराला हानी पोहोचते. आज आम्ही तुम्हाला या बद्दलच सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही चपाती बनवण्याच्या पद्धतीत बदल करू शकता. कारण अशी चपाती खाल्ल्याने केवळ तुमचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य बिघडू शकते. (Know the disadvantages of baking roti directly on gas flame)
जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील संशोधनानुसार , अशा प्रकारे चपाती बेक केल्याने वायु प्रदूषक सोडले जाते, ज्याचे वर्णन WHO ने हानिकारक मानले आहे. त्या प्रदूषित वायूमध्ये कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड असे प्राणघातक वायू असतात.
अधिक वाचा: Turmeric Face Pack: हळदीचा फेस पॅक वापरण्याचे फायदे आणि तयार करण्याच्या पद्धती
फूड स्टँडर्ड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट (2011) यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की चपाती थेट गॅसवर बेक केल्याने कार्सिनोजेनिक रसायने उत्सर्जित होतात जी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. थेट आचेवर शिजवलेल्या चपात्या आरोग्यास कीती हानी पोहोचवतात हे आत्ताच सांगता येणार नाही.
अधिक वाचा: How to Lose Weight in 10 Days: दहा दिवसांत कमी करा वजन, तज्ञांच्या टिप्स आणि 10 दिवसांचा आहार योजना
यावर अजून संशोधनाची गरज आहे. पण आतापर्यंतचे संशोधन पाहता, अशाप्रकारे चपाती बेक केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, त्यामुळे चपाती फक्त तव्यावर बेक करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे आहे.