तुम्हाला दातांच्या समस्या आहेत का? हे घरगुती उपाय तुमचे दात बनवतील चमकदार

तब्येत पाणी
Updated Feb 11, 2021 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेकजण असे असतात ज्यांना दाताच्या कोणत्या ना कोणत्या समस्या असतात. अनेकदा लोक तक्रारी करत असतात की महागड्या टूथपेस्ट वापरूनही त्यांचे दात साफ होत नाहीत.

teeth
तुम्हाला दातांच्या समस्या आहेत का? जाणून घ्या हे घरगुती उपाय 

थोडं पण कामाचं

 • हिरड्या कमकुवत झाल्या तर दात सुद्धा कमकुवत होतात.
 • अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न राखणं किंवा स्मोकिंग या कारणांमुळे आपल्या हिरड्या खराब होतात.
 • काही घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात

मुंबई: हल्ली अनेकांना दाताच्या समस्या सतावत असतात. महागड्या टूथपेस्ट तसेच ब्रश वापरूनही लोकांच्या तक्रारी असतात की त्यांचे दात चमकदार दिसत नाहीत.तुम्हालाही ही समस्या आहे तर काही घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. 

अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न राखणं किंवा स्मोकिंग या कारणांमुळे आपल्या हिरड्या खराब होतात. वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हिरड्यांचं दुखणं वाढतं आणि मग त्यावर सूजही येते. हिरड्या कमकुवत झाल्या तर दात सुद्धा कमकुवत होतात. या घरगुती उपायांनी तुम्ही दातांची चमक, तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता. या घरगुती उपायांमुळे दात तसेच हिरड्या मजबूत होण्यास नक्कीच मदत होईल. जाणून घ्या हे उपाय...

 1. आपले दात चमकदार बनवण्यासाठी एक चमचा खाण्याचा सोडा घ्या. त्यात एक चमचे बारीक मीठ आणि कुटलेली तुरटी घ्या. तीनही एकत्रित करून याचे मिश्रण बनवा. याने दररोज आपले दात स्वच्छ करा. 
 2. थोड्याशा बेकिंग सोड्यामध्ये ताज्या लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता दातांना एका चांगल्या टिश्यू पेपरने रगडून साफ करा. या पेस्टच्या मदतीने ब्रशच्या सहाय्याने दातांवर लावा. 
 3. मोहरीच्या तेलात मीठ मिसळून सकाळ-संद्याकाळ याचा वापर करा. यामुळे दातांतून रक्त येणे, हिरड्या तसेच दातदुखीपासून आराम मिळतो. यामुळे दातही चमकदार होतात. 
 4. सकाळी ब्रश करण्याआधी एक चमचा नारळ तेल तोंडात टाकून चांगेल घोळवा. १५मिनिटांपर्यंत हे तेल दातांवर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने गुळणी करा.हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. 
 5. सकाळी ब्रश करण्यानंतर अॅपल सिडेर व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन गुळणी केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. 
 6. संत्र्याचे साल सोबत तेजपत्ता बारीक करून घ्या. ही पावडर बोटांच्यामदतीने दातांवर लावा. 
 7. एक चमचा हळद आणि एक चमचा नारळ तेलात २-३ थेंब पुदिना थेंब तेलच मिसळा. हे मिश्रण दात साफ करण्यासाठी वापरा. 
 8. ताज्या कोरफडीचा रस अथवा जेल दात साफ करण्यास वापरा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी