Heart Attack Risk Factors: आजपासूनच या 3 वाईट सवयी टाळा, नाहीतर येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Health Tips : आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ह्रदयविकाराचा आजार वाढत चालला आहे. या आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यापैकी एक म्हणजे हृदयविकाराचा झटका (Heart Attack). हृदयविकार ही सामान्यत: वृद्धत्वाची समस्या मानली जाते, मात्र गेल्या काही वर्षांत तरुण वर्गही या गंभीर आजाराला बळी पडत आहेत. मागील काही दिवसांत काही सेलिब्रिटींचेदेखील अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाली आहेत.

Heart Attack
ह्रदयविकाराची कारणे 
थोडं पण कामाचं
 • धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ह्रदयविकाराचा आजार वाढला
 • गेल्या काही वर्षांत तरुण वर्गही या गंभीर आजाराला बळी पडतायेत
 • आपल्या सवयी सुधारून आपण हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी करू शकतो.

Heart Disease:नवी दिल्ली : आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ह्रदयविकाराचा आजार वाढत चालला आहे. या आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यापैकी एक म्हणजे हृदयविकाराचा झटका (Heart Attack). हृदयविकार ही सामान्यत: वृद्धत्वाची समस्या मानली जाते, मात्र गेल्या काही वर्षांत तरुण वर्गही या गंभीर आजाराला बळी पडत आहेत. गेल्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla), कन्नड चित्रपटांचा लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी गायक केके (Singer KK) हे देखील या आजारामुळे निधन पावले. ह्रदयविकाराचा झटका का येतो, यामागची कारणे काय हे जाणून घेऊया. (Know the reasons and habits behind Heart deiseases)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 30 July 2022: सोन्याला पुन्हा सुगीचे दिवस...अमेरिकेचा जीडीपी घसरल्याचा परिणाम, पाहा खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का?

हृदयविकाराचा झटका का येतो?

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयाला रक्ताचा प्रवाह रोखला की हृदयविकाराचा झटका येतो. या प्रकारचा अडथळा सहसा रक्तवाहिन्यांमधील चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांच्या वाढीमुळे होतो. जाणूनबुजून किंवा नकळत आपण दररोज अशा काही गोष्टी करत असतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, सर्व लोकांना याची माहिती असणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे. आपल्या सवयी सुधारून आपण हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी करू शकतो. खाली त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या सवयी -

1. वजन नियंत्रणात न राहणे
धकाधकीच्या या जीवनात, बहुतेक लोक लठ्ठपणा किंवा जास्त वजनाच्या समस्येने त्रस्त असतात. हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीच्या घटकांपैकी एक असल्याचे आरोग्य तज्ञ मानतात. मायोहेल्थ म्हणते की लठ्ठपणामुळे उच्च रक्त कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो, या सर्वांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी वेळेत वजन कमी करा.

अधिक वाचा : Bhagat Singh Koshyari: मला शिव्या घालाव्याशा वाटतात, इतका नालायक माणूस राज्यपाल आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव: जितेंद्र आव्हाड

2. धूम्रपान आणि तणाव
अनेक अभ्यासातून असे दिसते की जे लोक धूम्रपान करतात आणि जास्त तणावाखाली असतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. खरं तर, धूम्रपानामुळे धमन्यांमध्ये कालांतराने प्लेक तयार होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे जास्त ताण घेतल्याने रक्तदाबाचा त्रास वाढतो, जो हृदयविकाराचा मुख्य घटक मानला जातो. यामुळेच तणाव न घेण्याचा आणि धूम्रपानापासून दूर राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

3. शारीरिक निष्क्रियता
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला आरामदायी जीवन आवडत असेल तर या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शारीरिक निष्क्रियतेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो यात शंका नाही. कारण जेव्हा शरीर निष्क्रिय राहते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी पदार्थ तयार होऊ लागतात. तुमच्या हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या खराब झाल्या किंवा ब्लॉक झाल्या तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामुळेच सर्व लोकांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योगासने आणि नियमित व्यायाम करून हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो.

अधिक वाचा : Rasik Dave Death : अभिनेते रसिक दवे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन, 'महाभारत'मधील 'नंदा' या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झाले

हृदयविकाराची लक्षणे -

 1. - छातीत दुखणे वाढणे
 2. -घाम येणे
 3. - श्वास लागणे
 4. - उलट्या, मळमळ
 5. - चक्कर येणे
 6. - अचानक थकवा
 7. - छातीच्या मध्यभागी काही मिनिटांसाठी तीव्र वेदना, जडपणा किंवा आकुंचन
 8. -हृदयापासून खांदा, मान, हात आणि जबडापर्यंत वेदना

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी