Tongue Colour: जीभ पाहून कसा येतो आजारांचा अंदाज? कुठला रंग काय सांगतो? वाचा सविस्तर

आपल्याला नेमका काय आजार झाला आहे, हे जिभेवरून कसं समजू शकतं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मात्र आपल्या शरीरात घडणाऱ्या घटनांचा आरसा म्हणून जिभेकडे पाहिलं जातं. शरीरातील अनेक आजार, विकार, रोग यांचं प्रतिबिंब जिभेवर दिसत असतं.

Tongue Colour
जीभ पाहून कसा येतो आजारांचा अंदाज?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जिभेच्या रंगावरून समजते आरोग्याची स्थिती
  • जिभेचा काळा रंग असतो सर्वाधिक भयंकर
  • पिवळा रंग म्हणजे कुपोषणाची खूण

Tongue Colour: जेव्हा आपण आरोग्याबाबतची (Health) एखादी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जातो, तेव्हा ते आपली जीभ (Tongue) दाखवायला सांगतात. अनेकदा जीभ पूर्ण तोंडाबाहेर काढून बारकाईने तिचं निरीक्षण करतात. त्यानंतर डॉक्टर आपल्याला झालेल्या संभाव्य आजाराचा प्राथमिक अंदाज बांधत असतात. आपल्याला नेमका काय आजार झाला आहे, हे जिभेवरून कसं समजू शकतं, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मात्र आपल्या शरीरात घडणाऱ्या घटनांचा आरसा म्हणून जिभेकडे पाहिलं जातं. शरीरातील अनेक आजार, विकार, रोग यांचं प्रतिबिंब जिभेवर दिसत असतं. जाणून घेऊया, जिभेवर दिसणारा कुठला रंग काय संकेत देतो, याविषयी. 

निळा रंग

जर तुमच्या जिभेवर निळा किंवा जांभळा रंग दिसत असेल, तर तो हृदयाच्या आरोग्याशी संबंधित विकाराचं लक्षण असण्याची शक्यता असते. तुमचं हृदय नीटपणे रक्त पंप करत नसल्याचं हे लक्षण मानलं जातं. त्याचबरोबर रक्तात ऑक्सिजनची कमतरता असल्याचंही हे लक्षण समजलं जातं. 

तपकिरी रंग

जे लोक प्रमाणापेक्षा जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन करतात, त्यांच्या जिभेवर करडा रंग येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तंबाखुचं सेवन करणारे आणि धुम्रपान करणारे नागरिक यांच्या जिभेचा रंग तपकिरी झालेला असतो. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो. 

अधिक वाचा - Blood Sugar Control Tips: मधुमेहाची लक्षणे दिसताच लगेच करा हे 5 उपाय...होईल फायदा

लालसर रंग

जर तुमच्या जिभेचा रंग गुलाबीऐवजी लालसरपणाकडे झुकलेला असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्याचं मानलं जातं. त्यामुळे जिभेवर लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात. त्याला जियोग्राफिक टंग असंही म्हटलं जातं. 

पांढरी जीभ

तुमच्या जिभेवर पांढरा रंगाचा थर चढू लागला असेल, तर तुम्ही जिभेची नीट साफसफाई करत नसल्याचं ते लक्षण मानलं जातं. तोंडाची सफाई नीट न झाल्यामुळे जिभेवर पांढरा रंग चढण्याची शक्यता असते. अनेकदा प्लू किंवा लिकोप्लेकियामुळेही जिभेवर पांढरा रंग येण्याची शक्यता असते. 

पिवळी जीभ

जर तुमची जीभ पिवळी पडायला सुरुवात झाली असेल, तर तुमच्या शरीरात पोषक घटक कमी असल्याचं ते लक्षण आहे. लिव्हर किंवा पोटात गडबड झाल्यामुळेदेखील जीभ पिवळी होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Water for weight loss: फक्त पाणी पिऊनही कमी होऊ शकतं वजन, असा करा वापर

काळी जीभ

जिभेचा रंग काळा पडणे, हे गंभीर आजाराचं लक्षण मानलं जातं. हे कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. फंगल इन्फेक्शन किंवा अल्सर असेल तरीही जीभ काळी पडल्याचा अनुभव येत असतो. प्रमाणापेक्षा जास्त स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींची जिभदेखील काळी पडण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - जिभेचा रंग आणि आरोग्याची स्थिती याबाबतची ही काही सामान्य निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी