sleep affect Men fertility: झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येते नपुंसकत्व, येतात या 3 समस्या ज्या सांगायला वाटेल लाज

प्रौढ व्यक्तीला 7-8 तासांची झोप आवश्यक असते. झोपेचे तास आणि गुणवत्ता कमी होणे शरीरात अनेक विकारांना जन्म देत असते.  पुरुषांमध्ये झोपेच्या समस्या नपुंसकत्वासारखे गंभीर परिणाम दर्शवतात. दरम्यान, न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्राणे यांनी झोप न येण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे.  निद्रानाश आणि त्याचे परिणाम रोजच्या सरावाने टाळता येतात.

Lack of sleep causes impotence in men
झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येते नपुंसकत्व , येतात या 3 समस्या ज्या सांगायला वाटेल लाज   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रौढ व्यक्तीला 7-8 तासांची झोप आवश्यक असते.
  • झोपेचे तास आणि गुणवत्ता कमी होणे शरीरात अनेक विकारांना जन्म देत असते.
  • झोप न लागणे हे अनेक आजारांचे लक्षण आहे.

Male Infertility Or Impotence: नोकरी (job) करणारे अनेकांना रात्रपाळी (night shift) करावी लागते. तर काही विद्यार्थी हे अभ्यासासाठी रात्रभर जागत असतात. परंतु रात्रीचे जागरण केल्याने आपल्या आरोग्यावर ( health) दुष्परिणाम होत असतात. अनेकजण हे रात्री उशिरापर्यंत जागत राहणे, पार्टी करणे, दारू पिणे ही आपली जीवनशैली करत असतात. त्यामुळे लोकांमध्ये झोपेशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. (Lack of sleep causes impotence in men)

अधिक वाचा  : कंटेंटच्या माध्यामातून Twitterवर कमवता येणार पैसा

झोप न लागणे हे अनेक आजारांचे लक्षण आहे. रात्री पुरेशी झोप न घेण्याने इतर अनेक गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात. झोप न लागणे किंवा अपुऱ्या झोपेची समस्या प्रत्येकाच्या आरोग्यावर समान परिणाम करते. परंतु पुरुषांमध्ये याचे परिणाम दिसून येतात, ज्याबद्दल ते स्वतः त्यांच्या पत्नीशी बोलण्यास कचरतात. अशा स्थितीत निद्रानाश दूर करण्याचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. 

शरीराच्या योग्य कार्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. झोपेचे प्रमाण वयानुसार बदलत असते. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला 7-8 तासांची झोप आवश्यक असते. झोपेचे तास आणि गुणवत्ता कमी होणे शरीरात अनेक विकारांना जन्म देत असते.  पुरुषांमध्ये झोपेच्या समस्या नपुंसकत्वासारखे गंभीर परिणाम दर्शवतात. दरम्यान, न्यूट्रिशनिस्ट रिद्धिमा बत्राणे यांनी झोप न येण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. निद्रानाश आणि त्याचे परिणाम रोजच्या सरावाने टाळता येतात.

झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये होते इरेक्टाइल डिसफंक्शन 

एनसीबीआयच्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. ज्या पुरुषांना नेक्टरल हायपोक्सिमिया नावाची स्थिती आहे त्यांना नंतर मध्यम ते पूर्ण इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. स्लीप एपनियामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन देखील होऊ शकते.

अधिक वाचा  :आता मेटामधील अनेकांना आठवड्याभरात मिळणार नारळ 

​लॉवर यूरिनरी ट्रेक्ट (LUTS)

ही समस्या बहुतेकदा वृद्ध पुरुषांमध्ये उद्भवते. प्रभावित व्यक्तींमध्ये लघवीचा खराब प्रवाह, मूत्राशय अपूर्ण रिकामे होणे, ताण येणे, लघवीच्या वारंवारतेत बदल, रात्री वारंवार लघवी होणे यांचा समावेश होतो. या स्थितीचा झोपेवर परिणाम होतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि निद्रानाशामुळे देखील पुरुषांमध्ये मूत्रमार्गाची लक्षणे कमी होऊ शकतात. 

झोप न मिळाल्याने नपुंसकत्व येते

झोपेची कमतरता हा पुरुषांमधील वंध्यत्वाशी संबंधित आहे. खरं तर, झोप न लागल्यामुळे किंवा कमी झोपेमुळे शुक्राणूंची निर्मिती कमी होते, ज्यामुळे पुरुषाच्या मूल होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी