कोरोना किंवा मंकीपॉक्स नाही तर लासा फीव्हरची नायजेरियात दहशत, १५५ मृत्यू

Lassa Fever Causes Many Deaths In Nigeria Know The Symptoms Of Lassa Fever : कोरोना किंवा मंकीपॉक्स नाही तर लासा फीव्हरची नायजेरियात दहशत पसरली आहे. आतापर्यंत नायजेरियात लासा फिव्हर अर्थात लासा ताप या आजारामुळे १५५ मृत्यू झाले आहेत.

Lassa Fever Causes Many Deaths In Nigeria Know The Symptoms Of Lassa Fever
कोरोना किंवा मंकीपॉक्स नाही तर लासा फीव्हरची नायजेरियात दहशत, १५५ मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोरोना किंवा मंकीपॉक्स नाही तर लासा फीव्हरची नायजेरियात दहशत, १५५ मृत्यू
  • नायजेरियात अशी २४ राज्य आहेत जिथे लासा फिव्हर या आजाराचे रुग्ण आढळले
  • रक्तवाहिन्या फुटून शरीरात रक्तस्राव होण्याचा धोका

Lassa Fever Causes Many Deaths In Nigeria Know The Symptoms Of Lassa Fever : कोरोना किंवा मंकीपॉक्स नाही तर लासा फीव्हरची नायजेरियात दहशत पसरली आहे. आतापर्यंत नायजेरियात लासा फिव्हर अर्थात लासा ताप या आजारामुळे १५५ मृत्यू झाले आहेत. ही माहिती नायजेरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (Nigeria Centre for Disease Control - NCDC) या संस्थेने दिली. नायजेरियात अशी २४ राज्य आहेत जिथे लासा फिव्हर या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

लासा फिव्हरच्या नायजेरियात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ६८ टक्के रुग्ण हे ओंडो, ईदो आणि बाउची या तीन राज्यांतील आहेत. लासा फिव्हर हा विषाणू संसर्गातून वेगाने पसरणारा आजार आहे. या आजारात रक्तवाहिन्या फुटून शरीरात रक्तस्राव होण्याचा धोका आहे. आजार गंभीर स्थितीत पोहोचल्यास हे संकट निर्माण होते. यामुळेच लासा फिव्हर संकट लवकर नियंत्रणात आणण्यासाठी नायजेरियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. 

उंदरांच्या मलमुत्राने दूषित झालेले अन्न किंवा पाणी पोटात गेल्यास लासा फिव्हर होण्याचा धोका आहे. लासा फिव्हरचा विषाणू शरीरात गेल्यानंतर एक ते तीन आठवड्यांनी सक्रीय होतो. ताप येणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशा स्वरुपात आजाराची सुरुवात होते. 

कोरोना, मंकीपॉक्स किंवा इतर कोणताही संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्तीने आजारी असताना किंवा आजाराची सौम्य लक्षणे शरीरात आढळली असताना क्वारंटाइन होऊन उपचार घेणे आवश्यक आहे. पण काही जणांनी सौम्य लक्षणे आढळली असताना क्वारंटाइन होणे टाळले तर संकट परिसरात वेगाने पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मंकीपॉक्स सारखा आजार झाला असताना किंवा या आजाराची सौम्य लक्षणे आढळली असताना सेक्स करणे धोक्याचे ठरू शकते. डॉक्टरांकडून आणि सरकारी यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले नाही तर संसर्गजन्य आजार वेगाने पसरून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते. मोठे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार झाला असताना डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी