मनमोकळ हसल्याने वाढेल शरिरातील ऑक्सिजन पातळी, जाणून घ्या लाफिंग थेरपीचे फायदे

कोरोनाग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे आणि रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. आपला व्यक्ती वाचावा,यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनसाठी पळा- पळ सुरू आहे.

Laugh openly to increase oxygen level in the body
मनमोकळ हसल्याने वाढेल शरिरातील ऑक्सिजन पातळी  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • मन मोकळ हसल्याने आरोग्यासह ऑक्सिजनदेखील वाढते
  • आनंदी राहून तुम्ही कोरोना सारख्या आजाराला दूर ठेवू शकतात
  • हसल्याने वाढते तुमची इम्यूनिटी

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) कमी होत आहे आणि रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. आपला व्यक्ती वाचावा,यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनसाठी पळा- पळ सुरू आहे. रुग्णांचा ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकजण तणावात आहेत. यामुळे लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे. 
अशा स्थितीत जर तुम्हाला कोरोनावर मात द्यायची असेल तर कोरोनाच्या भितीतून बाहेर येत हसावे लागेल.(Laugh openly to increase oxygen level in the body)

अगदी खरं हसल्याने आपलं आरोग्य सुधारतं शिवाय आपल्या शरिरातील ऑक्सिजन पातळी देखील वाढवतं. ऑक्सिजन वाढल्याने तुम्ही कोरोना सारख्या आजाराला सहज मात देऊ शकतात कारण हसल्याने आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह हसण्याचे अनेक फायदे आहेत, आज आपण त्याचविषयी जाणून घेणार आहोत..

काय आहेत हसण्याचे फायदे  (Laughter Benefits)

ऑक्सिजन पातळी वाढते  (Oxygen Level)

एका संशोधनात असं लक्षात आले आहे की, हसल्याने आपले शरीर दीर्घ श्वास घेण्याचं आणि सोडण्याचा व्यायाम करते. यामुळे शरिरात ऑक्सिजनचा संचार होत असून ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राहत असते. 

रक्तदाब  (Blood Pressure) राहते व्यवस्थीत 

 हसण्याचा संबंध आपल्या शरिरातील रक्ताभिसरणशी पण आहे. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जे लोक मोकळ्यापणाने हसतात, त्यांचा रक्तदाब चांगला असतो.

रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढते 

या कोरोनाच्या काळात, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोक अनेत प्रयत्न करत आहेत? परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की हसण्यामुळेही प्रतिकारशक्ती वाढते. जे शरीरास रोगांविरूद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देते. हसण्यामुळे शरीरात अँटी-व्हायरल आणि संसर्ग प्रतिबंधित पेशी वाढतात.

वेदनांमधून आराम

 हसण्याने अनेक प्रकारच्या वेदनांमध्ये आराम मिळतो. उदाहरणार्थ, स्पॉन्डिलायटीस किंवा पाठदुखीत देखील आराम मिळते. लाफिग थेरपीमुळे वेदना कमी होते. फक्त हेच नाही, जर तुम्ही १० मिनिटे हसत असाल तर तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळू शकेल किंवा झोपेने सहज झोप मिळेल.

सकारात्मक विचार राहतील 

हसण्यामुळे शरीरात एंडॉरफिन संप्रेरक तयार होते, ज्यामुळे संपूर्ण शरीर आनंदी, सकारात्मक आणि चांगले होते. या संप्रेरकामुळे मूड फ्रेश होतो.

तणाव कमी होतो 

लाफिग थेरपी मानसिक आणि शारीरिक समस्यांना देखील प्रतिबंधित करते. हसणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. औदासिन्य देखील त्यापासून दूर राहते. हसण्याने सर्व ताण कमी होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी