Monkeypox Test : मंकीपॉक्सच्या तपासणीसाठी लॉन्च झाली RT-PCR किट, आता घर बसल्या करू शकता टेस्ट

मंकीपॉक्स (Monkeypox) झपाट्याने वाढत असल्यानं नागरिक चिंतेत आहेत. जगातील ब्रिटन, जर्मन, इटलीसह जवळपास 29 देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. परंतु अद्याप भारतात या विषाणूने बाधित असलेल्या एकही रुग्ण आढळून आला नसला तरी बचावासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क होत उपायोजना सुरू केल्या आहेत.

 Now you can test monkey pox at home
आता घर बसल्या करू शकता मंकीपॉक्सची टेस्ट   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
  • आजाराची तपासणी करण्यासाठी RT-PCR किट लॉन्च

नवी दिल्ली : मंकीपॉक्स (Monkeypox) झपाट्याने वाढत असल्यानं नागरिक चिंतेत आहेत. जगातील ब्रिटन, जर्मन, इटलीसह जवळपास 29 देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. परंतु अद्याप भारतात या विषाणूने बाधित असलेल्या एकही रुग्ण आढळून आला नसला तरी बचावासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क होत उपायोजना सुरू केल्या आहेत. यावर काम करताना देशातील एका प्रमुख कंपनीने या आजाराची तपासणी करण्यासाठी RT-PCR किट लॉन्च (Monkeypox Testing Kit) केले आहे. लवकरच ही किट बाजारात उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ( ICMR ) म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र यापासून बचावासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्व राज्यांना अलर्ट करण्यात येऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहे.

RT-PCR किटने तात्काळ मिळणार रिपोर्ट 

औषधी उपकरण निर्माण करणाऱ्या या कंपनीने शुक्रवारी या टेस्ट किटबद्दल माहिती जाहीर केली. कंपनीने सांगितले की, त्यांनी मंकीपॉक्सची रिअल टाईम रिपोर्ट देणारी टेस्ट कीट विकसित केली आहे. या किटच्या वापराने तात्काळ लक्षात येईल की, रुग्णाला ऑर्थोपोक्स व्हायरस म्हणजेच मंकीपॉक्सचे लक्षण आहेत किंवा नाहीत.

चार रंगात आहे कीट –

रिपोर्टनुसार ट्रिव्हिट्रोन हेल्थकेअरच्या संशोधन आणि विकास टीमने ही RT-PCR किट बनवली आहे. ही कीट चार रंगात बनवण्यात आली आहे. प्रत्येक रंगात एक विशेष फ्लेवर वापरण्यात आलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सिंगल ट्यूबमध्ये स्वॅबद्वारे ही तपासणी होईल. यामुळे चेचक किंवा मंकीपॉक्सचा सहज तपास लागेल. या संपूर्ण प्रक्रियेला 1 तास लागेल
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी