Anti Aging: तज्ञांकडून जाणून घ्या अ‍ॅंटी एजिंग हायलुरोनिक ऍसिड वापरण्याचे तंत्र

तब्येत पाणी
Updated Apr 17, 2023 | 10:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hyaluronic Acid For Anti Aging:निरोगी आणि लवचिक त्वचा मेंटेन ठेवणे हे एक कठीण काम असू शकते, विशेषत: वयानुसार आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देणे कठीणच जाते. जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतसे त्वचा फिकट, पातळ आणि अधिक पारदर्शक होते हे अगदी सामान्य आहे.

Learn Anti Aging Hyaluronic Acid Techniques From Experts
Anti Aging: तज्ञांकडून जाणून घ्या अ‍ॅंटी एजिंग हायलुरोनिक ऍसिड वापरण्याचे तंत्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाढत्या वयाचे डाग, कोरडी त्वचा आणि सुरकुत्या या इतर समस्या आहेत ज्या तुमच्या वयानुसार उद्भवू शकतात
  • वृद्धत्वविरोधी एक नवीन कॉम्बो फॉर्म्युला
  • वृद्धत्वाची चिन्हे दिसली तर तुम्हाला योग्य प्रकारची स्किनकेअर ट्रिटमेंट घेणे आवश्यक आहे.

Anti Aging Treatment:निरोगी आणि लवचिक त्वचा मेंटेन ठेवणे हे एक कठीण काम असू शकते, विशेषत: वयानुसार आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देणे कठीणच जाते. जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतसे त्वचा फिकट, पातळ आणि अधिक पारदर्शक होते हे अगदी सामान्य आहे. जास्त वेळ सुर्यप्रकाशात राहील्याने त्वचेची लवचिकता कमी होते. हा बदल अनेकदा संयोजी ऊतकांमधील बदलांमुळे होते, या स्थितीला इलास्टोसिस म्हणतात. (Learn Anti Aging Hyaluronic Acid Techniques From Experts)


वाढत्या वयाचे डाग, कोरडी त्वचा आणि सुरकुत्या या इतर समस्या आहेत ज्या तुमच्या वयानुसार उद्भवू शकतात आणि जर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेत नसाल तर ते खूप चिंताजनक असू शकतात. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वृद्धत्वाच्या त्वचेची लक्षणे बहुतेक वेळा हायड्रेशन कमी होणे तसेच कोलेजन आणि इलास्टिनच्या कमतरतेमुळे असतात. अँटी-एजिंग रिझल्ट मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

अधिक वाचा: Diabetes Tips : लाल पालक रक्तातील शुगर लेवल करते नियंत्रित, जाणून घ्या फायदे

तुम्ही 60 वर्षांचा माणूस तंदुरुस्त, निरोगी आणि तरुण पाहिला आहे का? जर तुम्ही तो पाहिला असेल, तो चांगला आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीमुळे घेत आहे असे समजा. जर तुम्हाला वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली असतील, जसे की सुरकुत्या, त्वचा पातळ होणे, त्वचा ठिसूळ होणे, त्वचेच्या थरांखाली चरबीच्या पेशी कमी होणे इ. त्यामुळे हे परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काही आवश्यक पावले उचलू शकता. hyaluronic अ‍ॅसिड हा एक प्रभावशाली उपाय आहे ज्याचा वापर करून सुरकुत्या किंवा वृद्धत्वाची इतर चिन्हे दूर करता येतात.

वृद्धत्वविरोधी एक नवीन कॉम्बो फॉर्म्युला


टाईम्स नाऊ डिजिटलशी केलेल्या चर्चेत डॉ. जगदीश सखिया, मुख्य त्वचाविज्ञानी, सखिया स्किन क्लिनिक यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत एक नवीन कॉम्बो फॉर्म्युला सुपर कॉम्बिनेशन म्हणून वापरला जात आहे. यामध्ये बायो-रिमॉडेलिंग आणि हायलुरोनिक अ‍ॅसिडचा समावेश आहे आणि कोणत्याही थेरपी प्रोफाइलचा अवलंब केला जात आहे. यामध्ये चांगल्या परिणामांसाठी प्रोफाइल इंजेक्शनचा वापर केला जातो. हे अल्ट्राप्युअर हायलुरोनिक अ‍ॅसिड (HA) चे बनलेले आहे जे त्वचेच्या ऊतींचे अनेक स्तर पुन्हा निर्माण करण्यासाठी तयार केले जाते. हा कॉम्बो फॉर्म्युला इलास्टिन आणि कोलेजनचे उत्पादन वाढविण्याचे कार्य करते; जे त्वचेचा योग्य पोत, रचना, लवचिकता आणि रंग सुनिश्चित करण्यात मदत करते. Hyaluronic acid हे शरीरातील एक असे शक्तिशाली नैसर्गिक प्रथिने आहे जे तुमचे डोळे, चेहरा, मान, हात आणि सांधे या अवयवांसाठी काम करते. HA शॉट्सचा योग्य डोस मिळाल्यास या अवयवांना त्याचा फायदा होतो.

अधिक वाचा: Vegan Foods Rich In Calcium: या पाच पदार्थांमध्ये आहे दूध-दही इतकं कॅल्शिअम, किती मार लागला तरी तुटणार नाहीत तुमची हाडं


तुमची त्वचा ही कदाचित पहिली गोष्ट आहे जी कोणाच्याही लक्षात येते. एक निर्दोष त्वचा तुम्हाला केवळ तेजस्वी आणि अधिक लूक देत नाही, तर तुमचा आत्मविश्वास देखील वाढवते. जर तुम्हाला सुरकुत्या, रेषा, डोळ्यांखाली काळे डाग आणि वृद्धत्वाची इतर चिन्हे दिसली तर तुम्हाला योग्य प्रकारची स्किनकेअर ट्रिटमेंट घेणे आवश्यक आहे. Profilo मध्ये शुद्ध Hyaluronic Acid चे उच्च प्रमाण असते, जे तुमच्या त्वचेला सुशोभित करण्यात मदत करतात.

यासाठी तुम्हाला तुमची त्वचा बरी होण्यासाठी कोणत्याही पोस्ट ट्रीटमेंटची गरज नाही; कारण प्रत्येक डोस तुमचे 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ संरक्षण करतो. हे एक नैसर्गिक सूत्र आहे जे वेदनाशिवाय शरीरामध्ये परिवर्तन घडवून आणते. यानंतर तुम्हाला निरोगी आणि सुंदर दिसणारी त्वचा मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी