तुम्हालाही मोमोज खाण्याची सवय आहे का, खाण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे नुकसान

Momo health issues: मोमोज प्रत्येकाचा आवडीचं चायनीज फूड आहे. काही लोकं हे दररोज खाणं पसंत करतात. जर का तुम्हीही मोमोजचे शौकीन आहात, तर आता खाण्यापूर्वी त्याचं नुकसान जाणून घ्या. 

Momos
तुम्हालाही मोमोज खाण्याची सवय आहे का, खाण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे नुकसान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः  थंडीच्या दिवसात लोकं नेहमीच स्ट्रीट फूडचा आनंद घेत असतात. पाणी पुरी, पाव भाजी, मोमोज सारखे काही स्ट्रीट फूड लोकांच्या खूप आवडीचे आहेत. हिवाळ्यात मोमोज खाण्याची मजाच काही और आहे. गरमागरम मोमोज खाणं लोकांना खूप आवडत. मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की, मैदयापासून बनलेले मोमोज फायदेशीर नसून शरीरासाठी खूप नुकसानदायक आहे. आज आम्ही तुम्हांला मोमोज खाण्याचे अनेक नुकसान सांगणार आहोत.

मोमोल भलेही चायनीज फूड असेल पण भारतीय ते मोठ्या चवीनं खातात. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक गल्ली आणि नाक्यावर मोमोजचे दुकान बघायला मिळतात. स्वस्त आणि चविष्ठ मोमोजची मागणी थंडीच्या दिवसात वाढते. तुम्हाला सांगू इच्छितो की, हे स्ट्रीट फूड खाण्याचे अनेक नुकसान आहेत. मोमोज तुम्हाला बऱ्याचदा गंभीर आजाराला आमंत्रण देऊ शकतो. जाणून घेऊया मोमोज खाण्याचे नुकसान. 

  • मैद्याच्या पीठापासून बनवलेला हे स्ट्रीट फूड स्वादुपिंडासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो.  ज्याचा परिणाम शरीराच्या स्वादुपिंडांवर होतो. स्वादुपिंडाव्यतिरिक्त मधुमेहाचा धोका देखील वाढतो.
  • मोमोजमध्ये मैदा व्यतिरिक्त अशा बर्‍याच गोष्टी मिसळल्या जातात की, जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. मोमोज तयार करण्यासाठी एझोडीकार्बोना माईड, बेंझॉयल पेरोक्साइड सारख्या पदार्थांचा समावेश केला जातो जेणेकरून मैद्याचं पीठ मऊ राहिल. हे सर्व घटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
  • मोमोज स्टीमद्वारे बनविले जातात, ज्यामुळे प्रथिने नष्ट होतात. मैद्याच्या पीठानं बनविलेले मोमोज दररोज खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आणि यामुळे आपण नेहमीच आजारी राहता. 
  • याशिवाय मोमोज खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही वाढतो. खरं तर, मैद्यात ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो ज्यामुळे मोमोज खाल्ल्यानं शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. ज्यानंतर हे खाल्ल्यास शरीरात मधुमेहाचा धोका वाढतो.
  • बर्‍याच वेळा लोक डिनरमध्येही मोमोज खातात. असे केल्याने आपण बद्धकोष्ठतेच्या समस्येचे बळी बनू शकता. मोमोजमध्ये फायबर नसते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.बद्धकोष्ठता नंतर, लोकांना डोकेदुखी आणि गॅस सारखे त्रास होण्यास सुरुवात होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...