International No Diet Day 2022: जाणून घ्या का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नो डाएट डे; काय आहे यामागील हेतू? 

International No Diet Day 2022 । दरवर्षी ६ मे हा आतंरराष्ट्रीय नो डाएट डे (International No Diet Day) म्हणून साजरा केला जातो. नो नाएट डे हा दिवस चीट डे म्हणून देखील साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास आहे, जी लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक आहेत आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप शिस्तप्रिय राहतात.

Learn why International No Diet Day is celebrated, What is the purpose behind this
जाणून घ्या का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नो डाएट डे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी ६ मे हा आतंरराष्ट्रीय नो डाएट डे म्हणून साजरा केला जातो.
  • मॅरी इवांस या महिलेने पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता.
  • आंतरराष्ट्रीय नो नाएट डे पहिल्यांदा १९९२ मध्ये साजरा केला होता.

International No Diet Day 2022 । मुंबई : दरवर्षी ६ मे हा आतंरराष्ट्रीय नो डाएट डे (International No Diet Day) म्हणून साजरा केला जातो. नो नाएट डे हा दिवस चीट डे म्हणून देखील साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास आहे, जी लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक आहेत आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप शिस्तप्रिय राहतात. नो डाएट डे च्या दिवशी अशी लोक कोणतीही बंधने न पाळता त्यांच्या आवडतीचा पदार्थ खाणे पसंद करतात. खर तर नो डाएड डे एकप्रकारे स्वत:प्रती प्रेम जाहीर करण्याचा दिवस आहे. आज संपूर्ण जगभर हा दिवस साजरा केला जात आहे. चला तर म जाणून घेऊया हा दिवस का साजरा केला जातो आणि यामागील प्रमुख हेतू. (Learn why International No Diet Day is celebrated, What is the purpose behind this). 

अधिक वाचा : लग्नाआधी महिला पोलिसाने होणाऱ्या पतीलाच घातल्या बेड्या

आंतरराष्ट्रीय नो डाएट डे का साजरा केला जातो? 

खराब जीवनशैली आणि चुकीचे आहारनियोजन यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवते. लठ्ठपणाला अनेक आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे व्यक्तीला ठरावीक वयाच्या आधीच लठ्ठपणाचा त्रास जाणवू लागतो, यामुळे त्याला अनेक आजार जसे की डायबिटीज, ब्लडप्रेशर, हृदयरोग, कोलेस्टेरॉल वाढणे, साधेंदुखी आदि तमाम आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. या समस्यांवर उपाय म्हणून तज्ञ मंडळी आहाराचे योग्य नियोजन करण्याचा महत्त्वाचा सल्ला देतात. कारण लठ्ठपणाच्या समस्येपासून आहार नियोजनच आपल्याला दिलासा देऊ शकते.

दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे लोक आपल्या आहाराचे नियोजन करत असतात, त्यामुळे कधी-कधी ते आपल्या जीवनाचा आनंद घ्यायला देखील विसरून जातात. आंतरराष्ट्रीय नो डाएट डेच्या दिवशी अशा लोकांना कोणताही नियम न पाळता मोकळ्यापणाने आपल्या आवडीचा पदार्थ खाण्याची संधी दिली जाते. या दिवशी शरीराला आकार देणारे सूत्र सोडून जीवन आनंदाने जगायला शिकवले जाते. या दिवशी लोक विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करतात आणि आपल्या नातेवाईकांना भोजनासाठी आमंत्रित करतात. या दिवशी ते आपल्या आवडत्या पदार्थांचा स्वाद घेऊन आनंद साजरा करतात. 

आंतरराष्ट्रीय नो डाएट डे चा इतिहास

आंतरराष्ट्रीय नो नाएट डे पहिल्यांदा १९९२ मध्ये साजरा केला होता. याची सुरूवात ब्रिटेनची महिला मॅरी इवांसने केली होती. मॅरीचा हेतू होता की, लोकांनी आपल्या शरीराच्या आकाराला लाजले नाही पाहिजे आणि जसे आपले शरीर आहे, जसे आपण दिसतो याचा स्वीकार केला पाहिजे. याशिवाय डायटिंगमुळे होणाऱ्या नुकसानाला देखील समजले पाहिजे. मॅरी इवांस स्वत: एनोरेक्सिया या आजाराने ग्रस्त होती. एनोरेक्सिया हा एक खाण्याचा आजार आहे. याला एनोरेक्सिया नर्वोसा असे देखील बोलले जाते. या आजारामुळे शरीराचे वजन वाढण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे वजन आणि लोहाविषयी गैरसमज असतात जे एनोरेक्सियाने ग्रस्त असतात ते त्यांचे वजन आणि शरीराचा आकार नियंत्रित करण्यासाठी सर्व प्रयत्न करतात.

हा आहे यामीगल हेतू

मॅरी इवांस या महिलेने डाएट ब्रेकर नावाची एक संघटना तयार केली आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातूनच पहिल्या आंतरराष्ट्रीय नो डाएट डे चे आयोजन केले होते. तिला लोकांना हे समजवायचे होते की तुम्ही स्वतःला जसे दिसता तसे स्वीकारले पाहिजे. आपल्या शरीराच्या आकारामुळे स्वत: ला लाज वाटून देऊ नका. तुमचे आयुष्य उत्साहाने जगा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी