Weight loss habits: नवी दिल्ली : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी, लोक सहसा जिम आणि सर्व प्रकारच्या महागड्या आहार योजनांचा अवलंब करतात. अर्थात ते वजन कमी करतात पण त्यांचा बराच वेळ आणि पैसाही (Money) खर्च होतो. साहजिकच हा प्रत्येकाना हा पर्याय परवडेल असे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा निकालही उशीरा लागतो. (Do these 8 tasks at home, you will lose weight fast)
लठ्ठपणा ही एक बहुतेक व्यक्तींसाठी मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा शरीरासाठी घातक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. बर्याच संशोधनांनी असा दावा केला आहे की, लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांना कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकारासह इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोकादेखील जास्त असतो. जर तुमच्याकडे व्यायामशाळेसाठी वेळ नसेल किंवा महागड्या आहारासाठी पैसा नसेल, तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही सवयींचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे वजन हळूहळू कमी होऊ शकते.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त करण्याची गरज नाही. या अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्ही दररोज सहज करू शकता. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी अशा सवयी अंगीकारल्या पाहिजे, ज्यातून तुमच्या शरिरावर कोणताच दुष्परिमाण होणार नाही. आम्ही त्या कामाबद्दल बोलत आहोत ज्या कामांना विज्ञानदेखील समर्थन देते. जर तुम्ही या सवयींचे काटेकोरपणे पालन केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.
न्याहारी हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाते. न्याहारीसाठी तुम्ही जे काही खाता ते तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कामासाठी ऊर्जा मिळते. प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्लाने दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. संशोधनात असे दिसून आले आहे की, उच्च प्रथिनेयुक्त नाश्ता खाल्ल्याने भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
सकाळची सुरुवात एक किंवा दोन ग्लास पाणी पिणे वजन कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. पाणी तुमची ऊर्जा वाढवून तुमच्या शरीरात बर्न होणाऱ्या कॅलरीजची संख्या वाढवण्यास मदत करू शकते. एका छोट्या अभ्यासानुसार, सकाळी 500 मिली पाणी प्यायल्याने चयापचय दर सरासरी 30% ने वाढू शकते.
दररोज तुमचे वजन तपासल्याने प्रेरणा मिळते आणि अनेक अभ्यासकांनी असा दावा केला आहे. एका अभ्यासानुसार, जे लोक रोज आपले वजन तपासत असतात, ते अधूनमधून वजन तपासणाऱ्यांच्या तुलनेत त्यांना सहा महिन्यांत सुमारे 13 पौंड (6 किलो) कमी करण्यात मदत केली.
सकाळी काही वेळ उन्हात गेल्याने व्हिटॅमिन डी तर मिळतेच पण वजनही कमी होऊ शकते. एका छोट्याशा अभ्यासात असे दिसून आले आहे की सकाळी सूर्यप्रकाशाचा परिणाम वजनावर होतो. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की सूर्यप्रकाशाने तुमची व्हिटॅमिन डीची गरजा पूर्ण केली जाते, याबरोबर वजन कमी करण्यात मदत करू शकते.
ध्यानामध्ये, तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुमचे विचार आणि भावना समजून घेण्याची संधी मिळेल. हे वजन कमी करण्यास आणि निरोगी खाण्याच्या सवयींना देखील प्रोत्साहन देते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ध्यान केल्याने वजन कमी होणे आणि लठ्ठपणाशी संबंधित वाईट खाण्याच्या सवयी सुधारू शकतात.
दुपारचे जेवणासाठी घरचा डबा आणा
आपले दुपारचे जेवण पॅक करण्याचा सराव करणे वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग असू शकतो. एका मोठ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक त्यांच्या जेवणाचे नियोजन करतात त्यांना चांगले जेवण मिळतेच शिवाय लठ्ठपणाचा धोका कमी होण्यास देखील मदत होते. दुसर्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, अधिक वेळा घरी शिजवलेले जेवण खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वढण्याचा धोका कमी होतो.
थोडी जास्त झोप घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की झोपेची कमतरता भूक वाढण्याशी संबंधित असू शकते. एका छोट्याशा अभ्यासात असे दिसून आले आहे की झोपेची कमतरता भूक आणि लालसेशी संबंधित आहे. हे उच्च कार्ब आणि उच्च कॅलरी असलेल्या गोष्टी खाण्याची तुमची लालसा वाढवू शकते.
दूरवरचा प्रवास करण्यासाठी वाहनांचा उपयोग करा, परंतु अगदी काही अंतरावर जायचे आहे, आणि तुम्ही गाडीने जात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकेदायक आहे. कार किंवा दुचाकीने जास्त प्रवास करणं हे तुमच्या कंबरेसाठी घातक आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की चालणे वजन कमी करण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार, कारने प्रवास करणाऱ्या लोकांचे वजन चालणाऱ्या लोकांपेक्षा जास्त वाढले होते.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.