Lemon-honey decoction: पावसाळ्यात लिंबू-मधाच्या काढ्याने कमी करा वजन, असा बनवा घरच्या घरी

तब्येत पाणी
Updated Jul 18, 2022 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lemon-honey decoction: अधिकतर लोक सध्या आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. अशातच हेल्दी डाएट आणि एक्सरसाईज यावेळेस उपयोगी ठरते. पावसाळ्याच्या दिवसांत एक्सरसाईज करायला बाहेर जाणे शक्य नसते. अशातच तुम्ही घरात उपाय करून वाढत्या वजनापासून सुटका मिळवू शकता. 

lemon-honey
पावसाळ्यात लिंबू-मधाच्या काढ्याने कमी करा वजन, असा बनवा घरी 
थोडं पण कामाचं
  • लिंबू-मधाच्या काढ्याने कमी होणार वजन
  • पावसाळ्याच्या दिवसांत हा काढा सर्दी-खोकल्यापासून करेल संरक्षण
  • पोटासंबंधीच्या समस्याही होतात दूर

मुंबई: वजन कमी करण्यासाठी लोक आजकाल काय काय करतात. डाएटपासून ते एक्सरसाईजपर्यंत प्रत्येक मार्गाने वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. वाढते वजन कंट्रोल अथवा कमी करण्यासाठी जितके गरजेचे हेल्दी खाण आहे तितकीच एक्सरसाईज करणेही गरजेचे आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात एक्सरसाईईजसाठी बाहेर पडणे कठीण होते. अशातच तुम्ही काही घरगुती उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

अधिक वाचा - 'अरे फोटो तो ले लो यार' रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

पावसाळ्याच्या दिवसांत वेट लॉससाठी घरगुती उपाय

वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मध मिसळून पिणे खूप फायदेशीर मानले जाते. हा एका उपाय आहे जो कोणत्याही मोसमात करता येतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत लिंबू आणि मधाचे सेवन करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. जर योग्य पद्धतीने लिंबू आणि मधाचे सेवन केले गेले तर पावसाळ्याच्या दिवसांतही वेगाने वजन कमी होऊ शकते. 

लिंबू आणि मधाचा काढा

पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकल्याची समस्या होणे ही सामान्य बाब आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू आणि मध अतिशय फायदेशीर आहे. या समस्यांसोबत वजन कमी करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत लिंबू आणि मधाचा काढा प्यायला जाऊ शकतो. 

अधिक वाचा - Rishabh Pant: एका ट्वीटने खोलले ऋषभ पंतच्या या खेळीचे गुपित

काढा बनवण्याची आणि सेवन करण्याची पद्धत

लिंबू आणि मधाचा काढा बनवण्यासाठी एखाद्या भांड्यात दोन ग्लास पाणी गरम करा. यात एक चमचा आल्याची पेस्ट टाका. तयानंतर काही वेळ हे पाणी उकळा. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे होईल तेव्हा यात लिंबूचे तुकडे  टाका. हे पाणी २-३ मिनिटे उकळा. आता हे पाणी गॅसवरून उतरवून यात एक चमचा मध मिसळा. हे पेय गरमागरम प्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी