Women Health | ज्या आजाराला महिला नेहमी किरकोळ समजतात, त्यातच असू शकतो कॅन्सरचा संकेत

Leucorrhoea in Women | ल्युकोरिया (Leucorrhoea) ही महिलांना होणारी एक यौन समस्या (women Disease) आहे. यामध्ये योनितून दिवसरात्र द्रव स्त्रावत असतो. याला वैद्यकीय भाषेत ल्युकोरिया असे म्हणतात. सर्वसाधारणपणे २५ ते ३५ वयोगटातील महिलांना हा होतो. अर्थात ही समस्या महिलांमध्ये खूपच आढळून येत असल्यामुळे त्या याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र तज्ज्ञांनुसार प्रत्येक वेळेस ल्युकोरिया हा साधारण किंवा किरकोळ नसतो.

Leucorrhoea Disease women often ignore
ल्युकोरियाकडे महिला करतात दुर्लक्ष 
थोडं पण कामाचं
  • महिलांचे हा आरोग्य हा अलीकडच्या काळात चिंतेचा विषय
  • ल्युकोरिया हा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार
  • या असू शकतात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लक्षणे

Leucorrhoea Disease women often ignore | नवी दिल्ली : महिलांना अनेक समस्यांना आणि आजारांना तोंड द्यावे लागत असते. अलीकडच्या काळात महिलांच्या आरोग्याविषयी (Women health) नेहमीच चिंता व्यक्त करण्यात येते आहे. ल्युकोरिया (Leucorrhoea) ही महिलांना होणारी एक यौन समस्या (women Disease) आहे. यामध्ये योनितून दिवसरात्र द्रव स्त्रावत असतो. याला वैद्यकीय भाषेत ल्युकोरिया असे म्हणतात. सर्वसाधारणपणे २५ ते ३५ वयोगटातील महिलांना हा होतो. अर्थात ही समस्या महिलांमध्ये खूपच आढळून येत असल्यामुळे त्या याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र तज्ज्ञांनुसार प्रत्येक वेळेस ल्युकोरिया हा साधारण किंवा किरकोळ नसतो. अनेक वेळा कॅन्सरसारखे (cancer) गंभीर आजाराचे ते लक्षण असू शकते. त्यामुळेच इलाज करताना संकोच करू नये. वेळीच योग्य इलाज केल्यास अनेक त्रासांना टाळले जाऊ शकते. (Leucorrhoea Disease women often ignore, which can be indication of cancer)

रोगाचे कारण-

जास्त आंबट, चटपटी, मसालेदार आणि तळलेले जेवण करण्याची सवय
मांस-दारूचे अधिक सेवन
शरीराच्या स्वच्छेतेकडे दुर्लक्ष
गर्भशयाला दुखापत
योनिमध्ये ट्रिकोमोन्स व्हेगिनेल्स या बॅक्टेरियाचे अस्तित्व
अनेकवेळा गर्भपात झाल्याने किंवा गर्भपात केल्यामुळे
मधुमेह, अॅनिमिया आणि बुरशीच्या संसर्गामुळे

या गंभीर आजाराचे चिन्ह असू शकतो ल्युकोरिया-

सर्व्हायकल कॅन्सर
एन्डोमेट्रियल कॅन्सर
गर्भाशयाला सूज
हार्मोनचे असंतुलन
किडनीचे आजार
जठराचे आजार
हिमोग्लोबिनची कमतरता
अनेकवेळा गर्भपात

ल्युकोरियामुळे होणारा त्रास

ल्युकोरियामुळे महिलांना अनेक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे अनेकवेळा प्रजननच्या अवयवांवर सूज येते. यामुळे महिलांना अशक्तपणा जाणवतो, चीडचीड होते, उत्साह कमी होतो, तणाव जाणवतो, मूडमध्ये सारखे बदल होतात.

यावर इलाज काय

ही समस्या टाळता कामा नये किंवा त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करून घ्यावी. त्यामुळे हा आजार प्राथमिक स्वरुपात आहे की त्यात एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे दडलेली आहेत हे समजू शकेल. याशिवाय भविष्यातील त्यातील धोक्यांनादेखील टाळता येऊ शकेल. बद्धकोष्ठतेमुळे हा आजार वाढतो. त्यामुळे जास्तीत जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. मसालेदार आणि तळलेले भोजन घेण्याऐवजी हलके, संतुलित आणि पौष्टिक भोजन करावे. शिवाय शरीराच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे आणि सिंथेटिक कपडे परिधान करणे टाळावे.

याशिवाय युरिक अॅसिड (Uric Acid)या घटकाबद्दल सहजा चर्चा केली जात नाही. कधीतरी शेजारीपाजारी किंवा नातेवाईकात एखाद्याला डॉक्टर जेव्हा याची चाचणी करण्यास सांगतात तेव्हा हा शब्द आपल्या कानी पडतो. मात्र अलीकडच्या काळात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: ३० व्या वर्षानंतर शरीरातील याच्या प्रमाणाबद्दल सावध राहण्याची आवश्यकता आहे. युरिक अॅसिड वाढल्यामुळे अंगदुखी, शरीरावर सूज येणे, सांधेदुखी इत्यादी तक्रारी होऊ शकतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी