ओठांची काळजी घेणारे ४ पदार्थ

Lip Care Tips चार पदार्थ वापरुन ओठांची काळजी घेणे सहज शक्य आहे. ओठांना लिपबाम किंवा लिपस्टिक लावण्यापेक्षा नैसर्गिक उपाय करणे व्यावहारिक आणि सोपे आहे.

Lip Care Tips
ओठांची काळजी घेणारे ४ पदार्थ 
थोडं पण कामाचं
  • ओठांची काळजी घेणारे ४ पदार्थ
  • ओठांना लिपबाम किंवा लिपस्टिक लावण्यापेक्षा नैसर्गिक उपाय करणे व्यावहारिक आणि सोपे
  • चार पदार्थ वापरुन ओठांची काळजी घेणे सहज शक्य

Lip Care Tips नवी दिल्ली: हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा, केस, ओठ यांच्याशी संबंधित समस्या हमखास निर्माण होतात. शुष्कपणातून या समस्या निर्माण होतात. ओठ कोरडे पडणे, भेगा पडल्यामुळे ओठ फाटणे अशा समस्या निर्माण होतात. यावर नैसर्गिक उपाय आहेत. चार पदार्थ वापरुन ओठांची काळजी घेणे सहज शक्य आहे. ओठांना लिपबाम किंवा लिपस्टिक लावण्यापेक्षा नैसर्गिक उपाय करणे व्यावहारिक आणि सोपे आहे.

  1. मध - हिवाळ्याच्या दिवसांत ओठांना दिवसातून किमान एकदा मधाचे लेपन करावे. मधात अँटीबॅक्टेरियल तसेच जखमा भरणारे गुणधर्म आहेत. यामुळे ओठ कोरडे पडणे, भेगा पडल्यामुळे ओठ फाटणे या समस्या दूर होण्यास मदत होते. 
  2. नारळाचे तेल किंवा खोबरेल तेल - नारळाच्या तेलाचे ओठांना लेपन केले तर ओठांचा कोरडेपणा दूर होतो. नारळाच्या तेलातील मॉइस्चरायझिंगचा गुणधर्म कोरडेपणातून निर्माण होणाऱ्या ओठांच्या समस्या दूर करण्यास मदत करतो. नारळाचे तेल किंवा खोबरेल तेल त्वचा, केस, ओठ यांना लावल्यास शुष्कपणातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
  3. गायीचे तुप - गायीच्या तुपाचे ओठांना लेपन केले तर ओठांचा कोरडेपणा दूर होतो. गायीच्या तुपातील मॉइस्चरायझिंगचा गुणधर्म कोरडेपणातून निर्माण होणाऱ्या ओठांच्या समस्या दूर करण्यास मदत करतो. गायीचे तुप त्वचा, केस, ओठ यांना लावल्यास शुष्कपणातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते.
  4. दुधाची साय किंवा मलई - हिवाळ्याच्या दिवसांत ओठांना दिवसातून किमान एकदा दुधाच्या सायीचे लेपन करावे. त्वचा, केस, ओठ यांना दुधाची साय लावून थोड्या वेळाने ते स्वच्छ धुतल्यास शुष्कपणातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी