Alcohol side effects: दररोज दारू प्यायल्याने काय होते? वाचा सविस्तर...

What happen if daily drink alcohol? अनेकांना दारूचे व्यसन असते. मात्र, दारू जास्त प्रमाणात प्यायल्याने किंवा दररोज दारू प्यायल्याने काय होते हे तुम्हाला माहिती आहे का?

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Side effects of drinking alcohol : बऱ्याच दिवसांनी मित्र भेटल्यावर किंवा पार्टी करण्याच्या निमित्ताने अनेकजण दारू पितात. पार्टी करणं वाईट नाहीये मात्र, पार्टीच्या निमित्ताने दररोज दारू पिणे किंवा जास्त प्रमाणात दारू पिणे हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही सुद्धा दररोज दारू पित असाल तर मग थांबा... जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने तुम्हाला विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने होणारे दुष्परिणाम...

जास्त मद्यपानामुळे लिवरची समस्या

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने त्याचा परिणाम तुमच्या लिवरवर होऊ शकतो. शरीरातून हानिकारक आणि विषारी पदार्थ काढण्याचे काम लिवर करते. मात्र, जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास त्याचा परिणाम तुमच्या लिवरवर होतो आणि त्यामुळे लिवरला सूज येणे, जळजळ होणे अशा विविध समस्या उद्भवतात.

हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे

हृदयविकाराचा धोका

जे लोक जास्त प्रमाणात दारू पितात त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. अल्कोहोलच्या अतिसेवनाने हाय ब्लडप्रेशर, हार्ट फेल्युअर, स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. दररोज दारू प्यायल्याने तुमचे वजन सुद्धा झपाट्याने वाढू लागते.

हाडांच्या संबंधित आजार

दारूचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हाडांच्या संबंधित आजार होऊ शकतात. अशा व्यक्तींना ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवू शकते. जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे चांगल्या प्रकारे काम करत नाही. यामुळे हाडांच्या संबंधित समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.

हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?

जास्त दारू प्यायल्याने इतर अडचणी

जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्यांना डिसअथ्रियाचा धोका अधिक असतो. यामुळे बोलण्यात अडचणी येऊ लागतात.

वंधत्वाची समस्या

दारू जास्त प्रमाणात प्यायल्याने व्यंधत्वाची समस्या वाढू शकते. गरोदर महिलांनी मद्यपान केल्यास त्यांना तसेच जन्माला न आलेल्या बाळाला सुद्धा यामुळे धोका पोहोचू शकतो.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाहीये. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी