Health Tips : बसून काम ठरू शकतं 34 हून अधिक गंभीर आजारांचे कारण, व्यायाम ही वाचवू शकणार नाही!

तब्येत पाणी
Updated Mar 31, 2023 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Long Hours Sitting Effect: दिवसा जास्त वेळ बसणे अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते. हे टाळण्यासाठी तज्ञांनी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. 

बैठी आजार म्हणजे काय?
अधिक वेळ बसणे धोकादायक   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
 • बैठी जीवनशैलीचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. 
 • 34 हून अधिक गंभीर आजारांना आमंत्रण
 • बैठी आजार म्हणजे काय? 

Health Tips आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. आता कोणतेही काम करण्यासाठी पूर्वीसारखे अधिक शारीरिक श्रम करावे लागत नाहीत. मात्र, हा आराम आपल्याला काहीप्रमाणात घातक देखील ठरू शकतो. कारण, यामुळे एका जागी अनेक वेळ बसण्याचा वेळ वाढला आहे. सध्याच्या बदलत्या बैठी जीवनशैलीचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. ऑफिसच्या बैठी काम व्यवस्थेमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. (Long Hours sitting causes more than 34 ifestyle disease)

आहार आणि आरोग्य तज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी सांगितले की, बसणे हे धूम्रपानाइतकेच धोकादायक आहे. जास्त बसून काम केल्यामुळे 34 पेक्षा जास्त आजार होऊ शकतात, ज्याला बैठी आजार म्हणता येईल. हा आजार इतका धोकादायक आहे की एकदा मागे लागला की तो पाठ सोडत नाही. 

अधिक वाचा : ​डास मारण्यासाठी लावलेल्या कॉईलमुळे घरात आग, 6 जणांचा मृत्यू

बैठी आजार म्हणजे काय? 

जास्तवेळ बसून काम केल्याने, किंवा अधिक वेळ बसण्याच्या सवयीमुळे बैठी आजार उद्भवू शकतात. अंजली मुखर्जी यांच्यामते, जास्त वेळ बसल्याने 34 पेक्षा जास्त आजार होऊ शकतात. हे आजार आपल्या जीवनशैली संबंधित असतात.  त्यातील काही प्रमुख नावे पुढीलप्रमाणे आहेत. 

 1. हृदयरोग
 2. टाइप 2 चा मधुमेह
 3. उच्च रक्तदाब
 4. पोटाची वाढती चरबी
 5. उच्च कोलेस्टरॉल
 6. अपचन
 7. बद्धकोष्ठता इ.

व्यायामाचा देखील होत नाही फायदा

जर तुम्हाला वाटत असेल की, व्यायामाने हे आजार टाळता येतात, तर तुमचा हा गैरसमज असू शकतो. अंजली मुखर्जी यांच्या मते हा आजार व्यायाम केला तरी होऊ शकतो. कारण, दिवसभर आपण बसूनच राहतो. म्हणूनच या रोगांचा धोका पूर्णपणे टळत नाही.

अधिक वाचा : व्हिटॅमिन-बी 12 साठी खा हे 5 शाकाहारी पदार्थ

 

7 -8 तास बसने टाळा 

जे लोक 7-8 तास बसून काम करतात आणि केवळ 2-3 तास प्रवासात घालवतात, त्यांची बसण्याची वेळ 10 तासांपेक्षा जास्त असते. अंजली मुखर्जी यांच्या मते, संशोधनात असे म्हटले आहे की दिवसातून 10 तासांपेक्षा जास्त वेळ बसल्याने हृदयविकार आणि इतर समस्यांचा धोका वाढू शकतो.

बैठी आजार टाळण्यासाठी या आहेत महत्वाच्या टिप्स

 • शक्य झाल्यास स्टँडिंग डेस्कचा वापर करा
 • शक्य असल्यास वॉकिंग मीटिंग करा
 • कामाच्यामध्ये स्ट्रेचिंग करा.
 • दररोज दीर्घ श्वास घ्या. 
 • 20 मिनिटे बसून झाल्यानंतर, 8 मिनिटे उभे राहण्याचा आणि 2 मिनिटे चालण्यासाठी वेळ काढा. 

*टिप्स ; सदर माहिती तुमच्या सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही उपचाराचा अवलंब करण्याआधी आपल्या डॉक्टरांचे मत विचारात घ्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी