Sitting Job Side Effects: तुमचे काम बैठे आहे का? ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार...

Health Tips : चुकीच्या वेळी खाणे, चुकीचा आहार घेणे याचा आरोग्यावर (Health) घातक परिणाम होतो आहे. लोकांची आजारपणं वाढली आहेत. अनेक गंभीर आजार घराघरात दिसून येत आहेत. अनेकजण सारखे आजारी पडत असतात. अनेकदा ऑफिसमध्ये बसून जास्त वेळ (Long Sitting jobs)काम करावे लागते. अनेकांच्या दिनचर्येचा हा भाग झाला आहे. त्याचा परिणाम थेट हाडांवर होतो.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • लोकांची जीवनशैली (Lifestyle)खूपच बदलली
  • अनेक गंभीर आजार घराघरात दिसून येतात
  • सतत बसून काम केल्याने अनेक आजारांच्या समस्या

Sitting Job Side Effects:नवी दिल्ली : जीवनशैली आणि आहार यांचा आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. अलीकडच्या काळात लोकांची जीवनशैली (Lifestyle)खूपच बदलली आहे. याचा विपरित परिणाम होत अनेक आजार वाढले आहेत. चुकीच्या वेळी खाणे, चुकीचा आहार घेणे याचा आरोग्यावर (Health) घातक परिणाम होतो आहे. लोकांची आजारपणं वाढली आहेत. अनेक गंभीर आजार घराघरात दिसून येत आहेत. अनेकजण सारखे आजारी पडत असतात. अनेकदा ऑफिसमध्ये बसून जास्त वेळ (Long Sitting jobs)काम करावे लागते. अनेकांच्या दिनचर्येचा हा भाग झाला आहे. ऑफिस आणि कामाच्या ताणामुळे अनेकांना 8 ते 9 तास सतत बसून राहावे लागते. त्याचा परिणाम थेट हाडांवर होतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त बसून काम केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, काय नुकसान होते हे जाणून घेऊया. (Long sitting jobs have negative effects on health)

अधिक वाचा : भारतात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख विवाह

सतत खूप बसून काम केल्याने होणारे आजार -

1. रोगप्रतिकार क्षमता
कामानिमित्त सतत खुर्चीवर बसून राहावे लागते. एकदा काम सुरू झाले की उठता येत नाही. अशा रितीने तासनतास खुर्चीत बसून काम केल्याने शरीरातील पेशी कमकुवत होतात. परिणामी रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळेच एकसलग खूप वेळ बसून राहू नका. काम करत असतानाच ब्रेक घेणे गरजेचे आहे. शिवाय काम संपल्यानंतर नियमितपणे व्यायामदेखील करणे आवश्यक आहे. 

अधिक वाचा : Alert : येत आहे शनि साडेसाती आणि शनि ढय्या

2. कंबरदुखी आणि पाठदुखी
वर्क फ्रॉम होम असो की ऑफिसमध्ये बसून काम करणे असो. जास्त वेळ बसून काम केल्याने हाडांवरदेखील ताण येतो. हाडे कमकुवत होऊ लागतात. खूपवेळ एकाच स्थितीत बसून राहिल्याने गुडघा आणि पाठीच्या दुखण्याला सुरूवात होते. अनेकांना कंबरदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अधूनमधून चालत राहणे आवश्यक आहे. शिवाय अनेकजण चुकीच्या पद्धतीने खुर्चीत बसतात. त्याचा हाडांवर विपरित परिणाम होतो. यामुळेच अलीकडे कंबरदुखी आणि पाठदुखीच्या समस्या वाढायला लागल्या आहेत. 

3. वजन वाढणे
बैठ्या कामांमुळे शारीरिक हालचाली मंदावतात. वजन वाढवण्यास सुरूवात होते. अलीकडे त्यामुळेच लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. व्यायामाचा अभाव आहे. एकदा का वजन वाढायला लागले की ते नियंत्रणात आणणे अवघड होऊन बसते. यातून पुढे अनेक आजारांचा जन्म होतो. 
सतत बसणे ही आरोग्याच्या चांगल्या सवयींपैकी एक नाही. 

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

4. स्मरणशक्तीवर परिणाम
बैठ्या कामामुळे किंवा तासनतास बसून काम केल्यामुळे सर्वात मोठा धोका म्हणजे स्मरणशक्ती कमी होते. कारण या जीवनशैलीचा तुमच्या मनावरदेखील परिणाम होतो. अनेक गोष्टी विसरायला होते. त्यामुळे व्यायाम करणे आवश्यक आहे.

कामाचे स्वरुप बदलणे आपल्या हाती नाही. मात्र काही गोष्टींची वेळीच खबरदारी घेणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टी आपल्या हातात आहेत. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी