उपाशी राहून बारीक होण्याचा प्रयत्न करताय? नका करू असे उपाय

तब्येत पाणी
Updated Nov 20, 2020 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

बारीक होण्यासाठी उपाशी राहणे हा पर्याय एकदम फालतू आहे. कारण यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित समस्या सतावू शकतात. 

weight loss
उपाशी राहून बारीक होण्याचा प्रयत्न करताय? नका करू असे उपाय 

थोडं पण कामाचं

 • उपाशी राहिल्याने आपले वजन कमी होऊ शकते.
 • जेव्हा तुम्ही उपाशी राहून वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते
 • फायबरयुक्त जेवण जेवल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. तसेच शरीराला योग्य प्रमाणात उर्जा मिळते.

मुंबई: आपल्या देशात एक वेगळ्याच प्रकारची सवय लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. जे लोक दिसण्यामध्ये सामान्य आहेत त्यांनाही आपले वजन घटवायचे(weight loss) आहे आणि स्लिमट्रिम राहायचे आहे. मात्र जे लोक वास्तवात लठ्ठ(fatty people) आहे त्यांना बारीक होण्याची काळजी आहे. मात्र यांना खाऊन-खाऊन बारीक व्हायचे आहे. दरम्यान, काही लोकांना असे वाटते की उपाशी राहिल्याने आपले वजन कमी होऊ शकते. त्यामुळे असे लोक उपाशी राहतात. मात्र ही अजिबात चांगली आयडिया नाही. 

शरीराला होते हे नुकसान

 1. उपाशी राहून वजन घटवणाऱ्या लोकांच्या शरीरात पोषणतत्वांची कमतरता आढळते. याच कारणामुळे त्याची त्वचाही निर्जीव वाटते. तसेच शरीर आतून कमकुवत होते. यामुळे चेहऱ्याचे आकर्षण फिके होते. 
 2. तुम्ही डाएटिंग आकर्षक दिसण्यासाठी करत आहात मात्र त्याबदल्यात तुम्ही जर तुमची सुंदरता गमवाल तर ते योग्य नाही. उपाशी राहिल्याने तुमचा उर्जेचा स्तरही कमी होतो. 
 3. जेव्हा तुम्ही उपाशी राहून वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. कारण तुमच्या शरीरातील लिक्विड पदार्थ युरिन अथवा घामाने बाहेर गेलेले असतात. 
 4. याशिवाय बद्धकोष्ठता, मेटाबॉलिज्म कमकुवत होणे, महिलांना पीरिअड्ससंबधी समस्या, ब्लड प्रेशर हाय अथवा लो असणे, थकल्यासारखे वाटणे, कामात मन न लागणे या समस्या निर्माण होतात. 

काय आहे वजन घटवण्याची योग्य पद्धत

 1. वजन घटवण्याची योग्य पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करावा. कारण असे पदार्थ फॅट फ्री अथवा लो फॅटचे असतात. या पदार्थांमध्ये रेशांचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनक्रिया धीमी होते आणि योग्य पद्धतीने होते. 
 2. फायबरयुक्त जेवण जेवल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. तसेच शरीराला योग्य प्रमाणात उर्जा मिळते. तसेच सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या शरीरावर चरबी जमा होत नाही. 
 3. वजन कमी कऱण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी आणि नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जातात. 
 4. दररोज वॉक आणि एक्सरसाईज करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. यामुळे शरीर निरोगी राहते. तसेच शरीरावरची एक्स्ट्रा चरबी कमी होण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी