lose weight with lemon: फक्त 1 लिंबू पोटाची चरबी  करेल नाहीशी

lose weight with lemon water : जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर लिंबू तुमची मदत करू शकते.

lose belly fat in just 10 days with this lemon water diet lose weight and get flat stomach fast
lose weight with lemon: 1 लिंबू पोटाची चरबी  करेल नाहीशी 
थोडं पण कामाचं
  • लिंबू एक अशी गोष्ट आहे, जो चवीला आंबट असली तरी आरोग्यासाठी अनेक गोड फायदे देऊ शकतो.
  • लिंबू पाणी हा एकंदरीत आरोग्यसाठी एक सोपा उपाय आहे.
  • वजन कमी करण्यासाठी लेमन टी फायदेशीर आहे.

lose weight with lemon: जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर लिंबू तुमची मदत करू शकते. होय, लिंबू एक अशी गोष्ट आहे, जो चवीला आंबट असली तरी आरोग्यासाठी अनेक गोड फायदे देऊ शकतो.

त्याच्या नियमित वापराने, आपण जलद वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे लिंबूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, लिंबूपाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी तर जळतेच, पण वजनही सहज कमी होते.

लिंबू आरोग्यासाठी अनेक फायदे देते

लिंबू पाणी हा एकंदरीत आरोग्यसाठी एक सोपा उपाय आहे. जे तुमच्या शरीराला केवळ डिटॉक्सिफाई करत नाही तर लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पचनाच्या समस्या दूर करतात.

वजन कमी करण्याबाबत आयुर्वेद डॉक्टर काय म्हणतात?

आयुर्वेद डॉक्टर अच्युत ताम्हाणे यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी स्नॅकिंगच्या सवयीसाठी जेवणाच्या वेळेसोबतच शरीराला हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे. आहार बदलल्याने चयापचय तर सुधारतोच, पण पोटाची चरबीही कमी होते. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहून शरीर सडपातळ दिसू लागते. यासाठी तुम्ही लिंबाचा आहारात खालील प्रकारे वापर करू शकता.

वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे लिंबाचा वापर करा

वजन कमी करण्यासाठी लेमन टी फायदेशीर आहे. एका कप चहामध्ये लिंबाचे २-३ थेंब टाकून प्यायल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.
सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि त्वचेवरही चांगला परिणाम होतो.
लिंबू पिळून सॅलडमध्ये रिकाम्या पोटी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला चव तर मिळेलच पण वजन कमी होण्यासही मदत होईल.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. तुम्ही लिंबूपाणी मध मिसळूनही पिऊ शकता. याशिवाय काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

लिंबू चरबी देखील बर्न करते

लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकते, ज्यामुळे वजन सहज कमी होते. तसेच, ते स्नायूंना टोन करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते.


येथे दिलेली माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. ही माहिती टाइम्स नाऊ मराठी फक्त तुम्हाला शिक्षित करण्यासाठी देत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी