नवी दिल्ली: Onion For Weight Loss: वजन कमी करताना (Losing Weight) पहिल्यांदा डाएटचा (Diet) विचार करण्यात येतो. डाएट करत असताना आपण अनेकदा काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल गोंधळून जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना डाएटमध्ये काय खावं अशा एका साध्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ही साधी गोष्ट तुम्हाला सहज तुमच्या किचनमध्ये कोणत्याही प्रयत्नाशिवाय सापडेल. ही साधी गोष्ट म्हणजे घरात कायम असलेला कांदा.
कांदा ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही स्वयंपाक करताना रोज वापरता. पण आतापर्यंत तुम्हाला कदाचित माहिती ही नसेल की कांदा खाल्ल्यानं तुमचं वजन झपाट्यानं कमी होऊ शकते. हे गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया कांद्याने वजन कसे कमी करता येईल. त्यासाठी काय मार्ग आहेत.
अधिक वाचा- 'या' कारणानं व्यावसायिकानं कारमध्येच स्वतःला संपवलं, पत्नी आणि मुलालाही पेटवण्याचा प्रयत्न
कांद्याचे फायदे
कांद्यापासून बनवण्यात येणाऱ्या रेसिपी
ओनियन ज्यूस
ओनियन ज्यूस तयार करण्यासाठी सोललेला लहान कांदा 1 कप पाण्यात उकळवा आणि त्याचे चौकोनी तुकडे करा. ते थंड होऊ द्या आणि 1 कप पाणी घालून मिक्सरला लावा. हा रस एका ग्लासमध्ये टाकून प्या.
ओनियन सूप
एका कढईत 1 टीस्पून तेल आणि 2 लसूण पाकळ्या घालून चांगले परतून घ्या. यानंतर 2 चिरलेले कांदे आणि तुमच्या आवडीच्या 1/2 कप भाज्या घाला. 2-5 मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात मीठ आणि मिरपूड घाला आणि 20 मिनिटे शिजवा. तुमचे घरगुती कांद्याचे सूप तयार आहे.
अधिक वाचा- शिंदे गटातल्या आमदारांचं ठरणार भवितव्य, आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
ओनियन अँड विनेगर
एक कांदा सोलून त्याचे लहान तुकडे करा. आता हा कांदा उसाच्या व्हिनेगरमध्ये भिजवा. भात आणि डाळबरोबर सॅलड म्हणून सर्व्ह करा.