Weight Loss : वाढलेले वजन कमी करणं आहे एकदम सोपं; फक्त प्यावा लागेल चहा

गेल्या काही दिवसांपासून बहुतेक जण वर्क फ्रॉम करत आहेत. यामुळे अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण जीमच्या पाय़ऱ्या झिजवत असतात.

 loss your weight in easy way
Weight Loss : वाढलेले वजन कमी करणं आहे एकदम सोपं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वाढलेले वजन कमी करण्यासाठी हर्बल टी अत्यंत फायदेशीर असते.
  • वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानले जाते.
  • दररोज सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक टी पिणे खूप फायदेशीर

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बहुतेक जण वर्क फ्रॉम करत आहेत. यामुळे अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण जीमच्या पाय़ऱ्या झिजवत असतात. पण जीम जाणे आणि व्यायाम करणे हे मोठं कष्टाचं काम असतं. पण आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक सोपं मार्ग सांगत आहोत.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी हर्बल टी अत्यंत फायदेशीर असते. आपले वजन झटपट कमी करण्यासाठी आपण दररोज हर्बल टीचे सेवन केले पाहिजे. तुळशीचा चहा तयार करण्यासाठी तुळशीची पाने महत्वाची आहेत. एका अभ्यासानुसार, तुळस ताण आणि चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे दररोज तुळशीचा चहा पिल्याने आपले वजन झटपट कमी होते.

ग्रीन टी हे सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे, कारण हे विविध प्रकारचे आरोग्य फायदे देते. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात चांगली करायची असेल तर आपण ग्रीन टी घेतली पाहिजे. ग्रीन टी वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानले जाते. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होईल.

पुदिना चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपले मूड सुधारण्यासाठी कार्य करते. हा चहा तयार करण्यासाठी पुदिन्याच्या झाडाची पाने गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे ठेवा त्यानंतर हे पाणी प्या. हा चहा दररोज सकाळी रिकाम्यापोटी घेतल्याने वजन कमी होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक टी पिणे खूप फायदेशीर आहे. हा चहा तणाव संप्रेरकांची पातळी सामान्य करण्यास मदत करतो आणि चरबी बर्न करण्यास देखील मदत करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी