लठ्ठपणा वाढल्याने गेला होता कॉन्फिडन्स, ३ महिन्यांत घटवले २० किलो वजन

तब्येत पाणी
Updated Oct 22, 2021 | 18:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

या महिलेचे वजन ७३ किलो होते तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की त्यांना वजन कमी करायला हवे. पाहा त्यांनी कसे कमी केले वजन

weight loss
३ महिन्यांत घटवले २० किलो वजन, कसे ते पाहा 
थोडं पण कामाचं
  • डाएट प्लान योग्य आखणे गरजेचे
  • सोबतच दररोज वर्कआऊट आणि फिटनेस महत्त्वाचा.
  • आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवून त्या दिशेने जाणे.

मुंबई: क्रोहन नावाच्या आजाराने त्रस्त असलेली गृहिणी दलजीत कौर वजन वाढणे, एनर्जीची कमतरता आणि डिप्रेशनची शिकार झाली होती. याकारणामुळे ती स्वत:चा फोटो घेण्यास कचरत होती. दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान तीने आपले वजन घटवण्यास सुरूवात केली. तिच्या या हट्टामुळे तिने लॉकडाऊनमध्ये २० किलो वजन कमी केले. 

नाव - दलजीत कौर
व्यवसाय - गृहिणी
वय - ३० वर्षे
उंची - ५ फूट ५ इंच
शहर- अमृतसर
जास्तीत जास्त वजन - ७३ किलो
वजन कमी केले - २० किलो
वजन कमी करण्यास लागलेला वेळ - ३ महिने

दलजीत कौरच्या मते, क्रोहन आजाराचे समजल्यानंतर मला स्टेरॉईड सप्लिमेंट्सवर ठेवण्यात आले. यामुळे माझी भूक आणि आळशीपणा दोन्ही वाढले होते. त्यावेळेस माझे ७३ किलो वजन होते. जेव्हा मला जाणीव झाली की वजन घटवणे महत्त्वाचे आहे आणि मी खराब दिसू लागली आहे.  स्वत:ला आरशात जेव्हा पाहिले तेव्हा मला स्वत:चीच लाज वाटली. 

वजन घटवण्यासाठी काय होता डाएट प्लान

ब्रेकफास्ट - गुळ घातलेला चहा सोबत गव्हाची चपाती
लंच - मुग डाळीचा चिला, घरात बनवलेली एखाद्या भाजीसोबत आणि एक वाटी दही. कधी कधी ब्राऊन राईस अथवा बेसन चिला. 
डिनर - दहीसोबत एखादी वाटी भाजी, दलिया खिचडीसोबत लाईट सौटेड भाज्या
प्रीवर्कआऊट मील - ब्लॅक कॉफी
पोस्ट वर्कआऊट मील - फळे(२,३)
लो कॅलरी रेसिपीज - मुगडाळीचा चिला, पनीर, मखाणे.
कधी कधी खाण्याची इच्था पूर्ण करण्यासाठी खायचे - पराठे, नान, घरात बनवलेली मिठाई, मात्र कमी प्रमाणात. 

वर्कआऊट आणि फिटनेस जर्नी

मी यूट्यूबवर बऱ्याच वर्कआऊट मेंटर्सला फॉलो केले आणि फिटनेस जर्नी सुरू केली. घरात नियमितपणे २० मिनिटे बॉडी वर्कआऊट करत असे. त्यानंतर दररोज १५ हजार स्टेप्स यात जोडण्यास सुरू केले. जेवल्यानंतर चालण्यास सुरूवात केली. याशिवाय सोफ्यावर झोपणे बंद केले 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी