Coffee For Health: तुम्हाला कॉफी पिण्याची आवड आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

Benefits Of Coffee: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.

health care update
कॉफी पिण्याचे फायदे आणि तोटे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • कॉफी प्यायला अनेकांना आवडतं.
  • जोपर्यंत कॉफी प्रेमींना गरम कॉफी मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा मूड ठिक होत नाही.
  • काही लोक दिवसभरातला थकवा दूर करण्यासाठी कॉफी पितात.

Advantages Disadvantages Of Drinking Coffee: कॉफी प्यायला अनेकांना आवडतं. काही लोकं सकाळ संध्याकाळ अशी गरमागरम कॉफी पितात. त्यांना तशी सवय ही लागलेली असते. जोपर्यंत कॉफी प्रेमींना गरम कॉफी मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा मूड ठिक होत नाही. काही लोक दिवसभरातला थकवा दूर करण्यासाठी कॉफी पितात. तर कॉफीचा सुगंध इतका स्वादिष्ट असतो की कॉफीच्या वासानेच अर्धा ताण दूर होऊन जातो. कॉफी हे आरोग्यदायी पेय आहे. याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केल्यास आरोग्याला हानी पोहोचते. त्याचप्रमाणे कॉफी पिण्याची जास्त सवय देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर तुम्ही कॉफी पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी कॉफीचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घेणं खूप गरजेचे आहे.

अनेक पोषक घटकांचा समावेश कॉफीमध्ये असतो.

कॉफीमध्ये शरीराला फायदेशीर ठरणारे काही पोषक घटक असतात. कॉफीमध्ये व्हिटॅमिन बी 2 जे रिबोफ्लेविन आहे, व्हिटॅमिन बी 5 जे पॅन्टोथेनिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन बी 1 जे थायमिन आहे, व्हिटॅमिन बी 3 जे नियासिन आहे आणि फोलेट, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे घटक आहेत जे रोगांशी लढण्यास मदत करतात.

अधिक वाचा-  Tv Actress Urfi Javed: Ufff..! रणवीर सिंगची दुसरी बेगम व्हायला आवडले: उर्फी जावेद  

कॉफी तणाव दूर करते

कॉफी शरीरातील ताण आणि आळस दूर करते. यासोबतच शरीरातील ऊर्जाही वाढते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदू आणि मज्जासंस्थेची क्रिया वाढवण्यास मदत करतं. 

डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीजच्या रूग्णांसाठी कॉफी फायदेशीर आहे. त्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो. कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशरची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शुगरचा धोका कमी होतो.

हाडे दुखण्याची समस्या असू शकते

कॉफी हाडांसाठी हानिकारक आहे. कॉफीचे जास्त सेवन केल्याने हाडं दुखू शकतात. कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्यानं हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या घटकांची शरीरात कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. 

ही समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक 

याशिवाय कॉफीमुळे झोप न येणे, अस्वस्थता, चिंता, हृदयाचे ठोके वाढणं, पोट खराब होणे, मळमळ, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

(अस्वीकरण: या लेखातील टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी