Lower abs workout: सिक्स पॅक ॲब्ज (Six pack abs) बनवणं ही फारच आव्हानात्मक बाब असते. सहजासहजी सिक्स पॅक ॲब्स तयार होऊ शकत नाहीत. त्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप आणि शिस्त यांची गरज असते. सहापैकी सर्वात खालचे दोन ॲब बनवणं, हे सर्वात कठीण काम असतं. लोअर ॲब्ज तयार कऱण्यासाठी क्रंचेस, प्लँक, बटरफ्लाय किक आणि सीसर्स किक यासारखे व्यायाम करण्याची गरज असते. या व्यायमांनी मात्र ‘सिक्स पॅक ॲब’चे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
ॲब्ज बनवणं ही केवळ दिखाव्याची बाब नसते. तुमच्या पोटाचे स्नायू बळकट आणि आरोग्यपूर्ण झाल्याची ती खूण असते. सपाट पोट हे तुमच्या शरीराची रचना योग्य अवस्थेत ठेवण्यासाठी, कंबरदुखीपासून बचाव करण्यासाठी आणि गंभीर दुखापतींपासून बचाव कऱण्यासाठी आवश्यक असतात. सिक्स पॅकपैकी तळातील ॲब बनवण्यासाठी नेमके कुठले व्यायाम करावेत, हे जाणून घेऊया.
अधिक वाचा - Men’s health: महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त गंभीर असतात ‘हे’ आजार, वेळीच व्हा सावध
अधिक वाचा - Bathing Tips: अंघोळ करताना पाण्यात घाला ‘या’ पाच गोष्टी, दिवसभर राहा फ्रेश आणि तरतरीत