Weight Loss: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी नाहीतर ब्लू टी जास्त चांगली, अशी आहे फायदेशीर

Weight Loss From Blue Tea: ग्रीन टी आणि ब्लॅक टी चे आपण बरेच फायदे ऐकलात. मात्र तुम्हांला माहित आहे का की, या दोन्ही टी पेक्षा ब्लू टी आरोग्यासाठी जास्त चांगली आहे. जाणून घ्या ब्लू टीचे अफाट फायदे. 

Blue Tea
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी नाहीतर ब्लू टी जास्त चांगली 

थोडं पण कामाचं

  • ब्लू टी पूर्णपणे हर्बल टी असते. हे शंख पुष्पचं निळं फूल असतं.
  • याला इंग्रजीमध्ये Asian pigeonwings असं म्हणतात.
  • या फुलाची चहा बनवली जाते. याला बटरफ्लाय टी या नावानं देखील ओळखली जाते.

मुंबईः  ब्लू टी पूर्णपणे हर्बल टी असते. हे शंख पुष्पचं निळं फूल असतं. याला इंग्रजीमध्ये Asian pigeonwings असं म्हणतात. या फुलाची चहा बनवली जाते. याला बटरफ्लाय टी या नावानं देखील ओळखली जाते. निळं शंख पुष्पचं फूल उकळून बनवण्यात आलेल्या चहामध्ये एक नाही तर अनेक फायदे लपलेले आहेत. ब्लू टी दक्षिण- पूर्व आशियामध्ये सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. ही चहा स्वादिष्ट असते त्यासोबतच या चहाला छान सुंगध येतो. ही चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. 

ब्लू टीमध्ये अॅन्टिऑक्सिडेंटचा पावर हाऊस असतं. ब्लू टीमध्ये इतके जास्त अॅन्टिऑक्सिडेंट असतात जितके ग्रीन टी किंवा ब्लॅक टीमध्ये नसतील. या टीमध्ये असलेलं बायो-कंपाऊंट शरीरातील फ्रि रॅडिकल लढण्यासाठी मदत करतात. यामुळे इम्यून सिस्टम देखील मजबूत होतं. 

डायबिटीजपासून संरक्षण करते 

जर का तुम्हांला डायबिटीज आहे. तर तुम्हांला ब्लू टी पिणं गरजेचं आहे. शरीरात ब्लड शुगर आणि ग्लूकोज मॅनेज करण्यात ब्लू टी खूप काम करते. शरीरात कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन झाल्यास ही चहा ते इंफेक्शन नष्ट करते. दररोज कमीत कमी दोन कप ब्लू टी प्यायला पाहिजे. 

ब्लू टीमध्ये स्ट्रेस लेव्हल नष्ट करण्याचा गुण असतो. हे प्यायल्यानं मेंदूतल्या अनेक हार्मोन्सचा प्रवाह वाढतो ज्यामुळे तणाव कमी होतो. त्याच वेळी, हे कार्टिसॉल सारख्या हार्मोन्सच्या प्रकाशनास प्रतिबंधित करते, ज्यामुळे तणाव वाढत नाही. हे प्यायल्यानं चांगली झोप येते आणि शरीर निवांत होतं. 

स्किन आणि केसांसाठी लाभदायक 

ब्लू टीमध्ये अॅन्टिऑक्सिडेंट खूप असतात, ज्यामुळे आपली स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर होतं. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, या टीमध्ये व्हिटामिन आणि मिनरल देखील असतात. जो अॅन्टी एजिंगचं काम करते आणि केसांना चमक आणि मजबूत करतात. या चहामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट खूप असतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो आणि कोणाला कॅन्सर असेल तर पेशी वाढण्यास प्रतिबंधित करते. अॅन्टिऑक्सिडेंट आणि यातले गरजेचे मिनिरल्समुळे सेल्सला नुकसान होत नाही. 

डोळ्यांसाठी गरजेचं 

डोळ्यांना होणारा कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ब्लू टी खूप काम करतं. यात उपस्थित अॅन्टिऑक्सिडेंट डोळ्यातील पेशीत ब्लड सर्कुलेशन वाढवते. यामुळे डोळे चांगले राहतात. मोतीबिंदू, कमकुवत दृष्टी, रेटिनलशी संबंधित समस्येत ही चहा पिणं खूप फायदेशीर होतं.  

ब्लू टी जर तुम्ही रोज प्यायल्यास यामुळे लिव्हर, किडनी, पोट आणि आतड्यांची सफाई होते. ही चहा तुमचं शरीर डिटॉक्स करते. ही अॅन्टिऑक्सिडेंट, अॅन्टी-इंफ्लेमेटरी आणि नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवते. यूटीआय किंवा यूरिनशी संबंधित काही त्रासांमध्ये ही चहा फायदेशीर आहे. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 

ब्लू टीमध्ये मेटाबॉलिज्मशी संबंधित त्रास दूर करतं. मेटाबॉलिक रेट वाढवण्यात उपयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह होतं. एवढंच नाही तर हे लिव्हरची सूज देखील कमी करते. याव्यतिरिक्त मायग्रेनच्या रूग्णांनी रोज सकाळी ही चहा प्यायल्यास त्यांना मायग्रेनचा झटका येणं कमी होतं. ब्लू टी स्ट्रेस, अॅसिडीटी कमी करून ब्लड सर्कुलेशन वाढवते. ज्यामुळे मेंदूत रक्ताचा प्रवाह चांगला राहतो आणि मायग्रेन अॅटक येत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी