Cow Milk : गायींवर आहे लम्पीचं संकट; ताई-बाई अक्का गायीचं दूध घेतल्यानंतर ही घ्या काळजी

Cow Milk : लम्पी व्हायरस हा खरेतर व्हायरल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. हा गायींमध्ये पसरणारा विषाणू मानला जाऊ शकतो. कारण आतापर्यंत या विषाणूची लागण इतर कोणत्याही प्राण्यांना किंवा मानवांना झालेली नाही. गायींवर बसणारे डास किंवा माशांच्या माध्यमातून हा रोग पसरत असल्याचं सांगितलं जातं.  

Take this care after taking cow's milk
लम्पी आजार असताना गायीचे दूध आहे का सुरक्षित   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हा व्हायरस इतक्या झपाट्याने पसरत असल्याने माणसांची डोकेदुखी वाढली आहे.
  • लम्पी व्हायरस हा नवीन संक्रमण नाही. हा आजार फार जुना आहे.
  • दुग्धजन्य पदार्थ सध्या हानिकारक काही सावधगिरीचे उपाय केल्याने कोणतेही नुकसान होऊ शकत नाही.

 मुंबई  :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ( Social media ) गाईंच्या  ( cows )  आजारपणाचे फोटो  व्हायरल होत आहेत. गायींच्या अंगावर  खूप फोड्या आल्याचे दिसत आहे. यालाच लम्पी  व्हायरस  (Lumpy virus) म्हटलं जातं. हा व्हायरस आतापर्यंत गाई, म्हशी आणि हिरण यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या लम्पी व्हायरसमुळे लाखो गायींचा मृत्यू झाला आहे. गायी आणि म्हैशींवर हा आलेला असताना गायीचे दूध किती निरोगी राहील यावर अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असतो.   ( Lumpy crisis is on cows; Take this care after taking Tai-Bai Akka cow's milk)

हा व्हायरस इतक्या झपाट्याने पसरत असल्याने माणसांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक व्यक्ती दररोज म्हैस, गाय यांच्या दुधाचा आहारात समावेश करतात.  अशावेळी मनात शंका येते की, लम्पी व्हायरस झालेल्या गाईचं दूध  (cow's milk) पिणे सुरक्षित आहेत की नाही? कारण प्राण्यामार्फत असे काही आजार आहेत ज्याची मानवाला त्याची लागण झाली होती. लम्पी व्हायरस हा खरेतर व्हायरल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. हा गायींमध्ये पसरणारा विषाणू मानला जाऊ शकतो. कारण आतापर्यंत या विषाणूची लागण इतर कोणत्याही प्राण्यांना किंवा मानवांना झालेली नाही. गायींवर बसणारे डास किंवा माशांच्या माध्यमातून हा रोग पसरत असल्याचं सांगितलं जातं.  

अधिक वाचा  :  तरुणींचे नग्न फोटो, व्हिडिओ प्रियकराला पाठवत होती प्रेयसी

माणसांमध्ये पसरू शकतो लम्पी व्हायरस?

लम्पी व्हायरस हा नवीन संक्रमण नाही. हा आजार फार जुना आहे. याअगोदर आफ्रिकेत गाईंना लम्पी व्हायरसची लागण झाली होती. 2012 च्या सुमारास युरोप आणि आशियातील काही भागांमध्येही त्याचा प्रसार दिसून आला. मात्र, 2019 पासून त्याचा प्रभाव आशियामध्ये अधिक दिसून येत आहे. मात्र आजपर्यंत हा आजार माणसांना झाल्याचे आढळून आलेले नाही. 

किती सुरक्षित आहे डेअरी प्रोडक्ट?

आतापर्यंत गायींच्या माध्यमातून लम्पी विषाणू माणसात पसरल्याचे आढळून आलेले नाही. तसेच आजपर्यंत अशी कोणतीही घटना घडलेली नाही ज्यावरून असे म्हणता येईल की दुग्धजन्य पदार्थांचा वापर धोकादायक आहे. जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने देखील अद्याप अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. 

अधिक वाचा  :  Viral: नवस पूर्ण होताच बँण्ड बाजा लावत काढलं म्हशीच जावळं

दूध घेतल्यानंतर काय घ्याल  काळजी

दुग्धजन्य पदार्थ सध्या हानिकारक काही सावधगिरीचे उपाय केल्याने कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. जोपर्यंत गायींना या विषाणूचा धोका आहे, तोपर्यंत कच्चे दूध घेऊ नका. दूध उकळल्यानंतरच प्या. यासोबतच इतर दुधाचे पदार्थ शिजवल्यानंतरच वापरावेत. अशा परिस्थितीत चीज, तूप यांसारखे पदार्थ खाण्यापूर्वी गरम करून किंवा चांगले शिजवून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी