Hair Care: वय वाढण्यासोबतच केसही पांढरे होऊ लागतात. आजकाल फार कमी वयात केसं पांढरे व्हायला सुरु होतात. वय काहीही असो, जर तुम्ही पांढर्या केसांनी त्रस्त असाल तर आपल्यासाठी येथे काही घरगुती उपाय दिले जात आहेत जे केस नैसर्गिकरित्या केसांना काळं बनविण्यात मदत करतील.
सफेद केसांची समस्या दूर करण्यात मेथीचे दाणे फायदेशीर आहे. या दाण्यांमुळे फक्त केसचं काळे होत नाहीत तर केस गळती ही कमी होते. गरजेनुसार मेथीचे दाणे घ्या आणि रात्रभर त्यांना पाण्यात भिजवत ठेवा. त्याचा पॅक बनवून दुसऱ्या दिवशी केसांना लावा. दोन ते तीन तासांसाठी तुम्ही हे ठेवू शकता.
सफेद केसांना काळे करण्यासाठी काळी चहापण वापरु शकता. काळी चहा ( Black Tea) टोनर बनवून ते केसांवर लावू शकता. यासाठी काळा चहा पाण्यात उकळवून घ्या. जेव्हा पाण्याचा रंग काळा होईल तेव्हा ते थंड करुन घ्या. त्यानंतर हे पाणी केसांच्या मुळाशी लावा आणि 2 तासांनी धुवून टाका. काळ्या चहाला बारीक करुन त्याचा हेअर मास्क केसांना लावला जाऊ शकतो. त्याचा प्रभाव वाढविण्यासाठी, लिंबाचा रस देखील पिळून घ्या. अर्ध्या तासानंतर, हा केसांचा मास्क धुवून टाका.
अधिक वाचा : मोसंबीचे फायदे ऐकाल तर खातच रहाल
घरीच केसांना नॅचरल पद्धतीने काळे करण्यासाठी हेअर मास्कचा वापर करा. यासाठी एका वाटीत एक चमचा आवळ्याची पावडर घ्या, दोन चमचे काळी चहा घ्या, एक चमचा इंडिगो, एक चमचा ब्राम्ही पावडर एक चमचा त्रिफला पावडर मिक्स करुन घ्या. अर्ध्या तासासाठी ही पेस्ट लावल्यानंतर ते धुवा. केस काळे दिसू लागतील.