घरबसल्या तयार करा पपई आणि बर्फाचे फेशियल आणि 10 मिनिटात मिळवा पार्लरसारखा उजळपणा

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2021 | 10:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

पपईचे आईस क्यूब्स घरीच तयार करून आपण फक्त 10 मिनिटात पार्लरसारखा उजळपणा मिळवू शकता. यासाठी आपल्याला आपल्या घरीच असलेल्या गोष्टी वापरता येतील. आपल्या चेहऱ्यावर निखार येईल आणि ती थंड राहील.

Papaya
घरबसल्या तयार करा पपई आणि बर्फाचे फेशियल आणि 10 मिनिटात मिळवा पार्लरसारखा उजळपणा 

थोडं पण कामाचं

  • असे तयार करा पपईचे आईस क्यूब्स
  • असा करा या आईसक्यूब्सचा त्वचेसाठी वापर
  • त्वचेच्या प्रकारानुसार या गोष्टींची घ्या काळजी

पपई आईस क्यूब्स (Papaya ice cubes) फक्त काही मिनिटात आपल्या त्वचेला (skin) चमक (glow) आणू शकतात. त्वचेला तजेला देऊ शकतात. सोबतच गरमीच्या दिवसात (summer season) आपल्या त्वचेला थंडावा (coldness) देऊन तिचे आरोग्यही (health) व्यवस्थित राखू शकतात. हेच पपाया आईस क्यूब्स घरच्या घरी बनवण्याची कृती आम्ही आपल्याला सांगणार आहोत. एकदा हे बनवल्यानंतर आपण 4 ते 5 दिवस यांचा वापर करू शकता. पपई आपल्या त्वचेला पोषण (nutrition) देते जेणेकरून आपल्या वयाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत नाही. जाणून घ्या कसे तयार कराल हे आईस क्यूब्स.

असे तयार करा पपईचे आईस क्यूब्स

पपईचे आईस क्यूब्स तयार करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टींची गरज आहे-

  • पपईची एक फोड
  • 3 चमचे गुलाबजल
  • 2 चमचे मध
  • चिमूटभर हळद

सर्वात आधी पपईची पेस्ट तयार करून घ्या. यात गुलाबजल, मध आणि हळद मिसळा. तयार पेस्ट बर्फ तयार करण्याच्या ट्रेमध्ये घालून फ्रिजरमध्ये ठेवा.

असा करा या आईसक्यूब्सचा त्वचेसाठी वापर

हे आईसक्यूब्स चेहऱ्यावर लावण्याच्या आधी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. यासाठी फेसवॉशचा वापर करता आला तर उत्तम. हे आईसक्यूब सुती रुमालात ठेवा आणि हळूहळू आपल्या चेहऱ्यावर मसाज करण्यास सुरुवात करा. संपूर्ण चेहऱ्यावर याचा वापर करायचा आहे.

त्वचेच्या प्रकारानुसार या गोष्टींची घ्या काळजी

जर आपण सकाळी किंवा संध्याकाळी चेहऱ्यावर आईस क्यूब्सचा वापर करत असाल तर एकावेळी एकाच आईसक्यूबचा वापर करा. दुपारच्या वेळी आपल्याला हवे असेल तर एकापेक्षा जास्त आईसक्यूब्सचा वापर आपल्याला करता येईल.

  • तेलकट त्वचा: आईसक्यूब लावल्यानंतर चेहऱ्यावर टोनरचा वापर आवर्जून करा जेणेकरून त्वचेत ओलावा ब्लॉक करता येईल आणि त्वचा तजेलदार राहील.
  • कोरडी त्वचा: जर आपली त्वचा कोरडी असेल तर आईसक्ययूब लावल्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावा आणि नंतर मॉईश्चरायजरने मसाज करा. मसाज करताना त्वचेवर अधिक दबाव करू नका, हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.
  • सामान्य त्वचा: जर आपली त्वचा सामान्य असेल तर पपाया आईस फेशिलयनंतर आपल्या चेहऱ्यावर टोनर आणि कोरफडीचे जेल लावा. गरमीच्या ऋतूत सातत्याने एक आठवडाही जर आपण हे केले तर आपल्या त्वचेवरील तेज आणि उजळपणा वाढेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी