होळीच्या दिवशी वेगळ्या पद्धतीने बनवा ताजेतवाने करणारी थंडाई

तब्येत पाणी
Updated Mar 28, 2021 | 14:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात पारंपरिक थंडाईशिवाय होळीचा सण आणि त्याचा आनंद अपूर्ण वाटतो. ही थंडाई स्वादिष्ट तर असतेच, तसेच हे पेय हे आरोग्यासाठीही लाभदायक असते. यामुळे संपूर्ण दिवस ताजातवाना आणि शक्तीपूर्ण जातो.

Thandai recipe
होळीच्या दिवशी वेगळ्या पद्धतीने बनवा ताजेतवाने करणारी थंडाई  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • आरोग्यासाठीही लाभदायक असते थंडाई
 • थंडाई तयार करण्यासाठी घ्या हे साहित्य
 • थंडाई तयार करण्याची कृती

भारतात (India) पारंपरिक थंडाईशिवाय (traditional Thandai) होळीचा (Holi) सण आणि त्याचा आनंद (happiness) अपूर्ण (incomplete) वाटतो. ही थंडाई स्वादिष्ट (tasty) तर असतेच, तसेच हे पेय हे आरोग्यासाठीही लाभदायक (healthy) असते. यामुळे संपूर्ण दिवस ताजातवाना (fresh) आणि शक्तीपूर्ण (energetic) जातो. त्यामुळे फक्त सणासुदीलाच (festivals) नव्हे, तर संपूर्ण उन्हाळ्याच्या (summer) दिवसातच थंडाई पिणे लाभदायक असते. आजच्या होळीच्या दिवशी शाही थंडाई तयार करून त्याची मजा लुटण्याचा आनंद काही औरच असतो. जाणून घ्या या लेखातून ही थंडाई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य (ingredients) आणि कृती (recipe).

थंडाई तयार करण्यासाठी घ्या हे साहित्य

बडिशेपची पावडर - 1 टीस्पून
कलिंगडाच्या बिया - 1 टीस्पून
खसखस - 1 टीस्पून

गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या - 3 टेबलस्पून
साखर - 1 कप
काळ्या मिरचीचा मसाला - 8 छोटे चमचे
हिरवे वेलदोडे - 4
बदाम - 6
पिस्ता - 6
काजू - 6
थंड दूध - गरजेनुसार
केशर – गरजेनुसार
पाणी – गरजेनुसार

थंडाई तयार करण्याची कृती

 1. थंडाई तयार करण्यासाठी सर्वात आधी एका वाटीत खसखस, बदाम, पिस्ते, काजू, गुलाबाच्या पाकळ्या, कलिंगडाच्या बिया, काळी मिरची, वेलदोडा, बडीशेप एकत्र करून पाणी मिसळून भिजवा.
  2. थोड्या वेळाने यात थोडे केशर मिसळा आणि 3-4 तासांसाठी ठेवून द्या.
  3. यानंतर हे सर्व सामान एकत्र वाटून याचे वाटण तयार करून घ्या.
  4. एाक सुती कपड्यात हा मसाला घेऊन थंडाईच्या पेल्यात हे मिश्रण गाळून घ्या.
  5. आता पेल्यात साखर आणि थंड दूध घालून 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित हलवून घ्या.
  6. आता आपली थंडाई तयार आहे. आपल्या आवडीनुसार आता ही थंडाई सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी