Morning Skincare Tips: सकाळी उठून नक्की हे काम करा, चमकदार त्वचेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत फायदे मिळतील

तब्येत पाणी
Updated Mar 01, 2023 | 19:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

द्राक्षे आणि विविध प्रकारच्या बेरी सुकवून मनुका बनवतात. हे प्रोटीन, आयरन आणि फायबरचा खजीना आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दररोज मनुका खाल्याने व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम आणि पोटॅशियम पूर्ण डोस घेऊ शकता.

Make sure you wake up early in the morning and you'll reap the benefits from glowing skin to firmer breasts.
Morning Skincare Tips: सकाळी उठून चमकदार त्वचेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत फायदे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • द्राक्षे आणि विविध प्रकारच्या बेरी सुकवून मनुका बनवतात.
  • दररोज मनुका खाल्याने व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम आणि पोटॅशियम पूर्ण डोस घेऊ शकता.
  • मनुका पाणी बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करू शकतो.

Morning Skincare Tips From Raisin Water: द्राक्षे आणि विविध प्रकारच्या बेरी सुकवून मनुका बनवतात. हे प्रोटीन, आयरन आणि फायबरचा खजीना आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दररोज मनुका खाल्याने व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम आणि पोटॅशियम पूर्ण डोस घेऊ शकता. या व्यतिरिक्त, मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील आढळतात. हे बोलण झाले मनुक्याबद्दल, पण काय तुम्हाला हे माहित आहे की मनुक्याला ज्या पाण्यात भिजत ठेवतात त्यात पण पोषक तत्वांनी भरपूर असतात. आज आपण जाणून घेऊया मनुका पाण्याचे काय फायदे आहेत. 

वजन वाढवण्यात फायदेशीर 

जर तुम्ही बारीक आहात आणि वजन वाढवायच असेल तर मनुक्याचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. रात्रभर भिजत ठेवलेले मनुक्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण अधिक असते.

बद्धकोष्ठपासून आराम 

मनुका पाणी बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करू शकतो. सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्याल्याने पोट साफ होते. हे पाणी शरीराला हायड्रेट ठेऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकतो. 

रक्त वाढवते

मनुक्याचे पाणी शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्याचे काम करते. मनुक्यामध्ये आयरन  आढळते, म्हणून मनुका किंवा मनुक्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्तप्रवाहात वाढ होऊ शकते. 

चमकदार त्वचा 

त्वचेसाठी पण मनुका किंवा मनुक्याच्या पाणी फायदेशीर आहे. त्यात काही अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्याच्या सेवनमुळे त्वचा चमकदार आणि निरोगी बनते. 

सकाळ-सकाळी मुका किंवा मनुक्याच्या पाणी प्याल्याने तुमच्या शरीरात काही पोषक घटक सापडतात. म्हणून मनुक्याला तुमच्या रोजच्या डायटमध्ये समाविष्ट करा जेणेकरून तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी