Winter recipe : हिवाळ्यात बनवा गाजराच्या या स्वादिष्ट पाककृती

Winter recipe : थंडी सुरू होताच विविध प्रकारच्या भाज्या बाजारात येऊ लागतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे गाजर. गाजराच्या मदतीने अनेक प्रकारच्या मिठाई देखील तयार करता येतात.

Make these delicious recipes of carrots in the winter
हिवाळ्यात बनवा गाजराच्या या रेसिपीज, सोप्या आणि चवीष्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात बनवा गाजराच्या रेसिपी
  • हिवाळ्यात खा, गाजराची खीर आणि गाजराचे लाडू
  • बनवायला सोपी, आणि खायला चवीष्ट

Winter recipe : थंडी सुरू होताच विविध प्रकारच्या भाज्या बाजारात येऊ लागतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे गाजर. ज्याचा रस किंवा भाजी अनेकांना आवडते. पण अनेक घरांमध्ये मुलांना गाजर तसं विशेष आवडत नाही. त्यामुळे मुलांमध्ये गाजराची गोडी वाढवायची असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारदेखील सर्व्ह केले जाऊ शकते. होय, गाजराच्या मदतीने अनेक प्रकारच्या मिठाई देखील तयार करता येतात.


गाजराचा हलवा तर सर्वांनाच माहिती आहे, पण आज आम्ही तुम्हाला गाजराच्या हलव्याव्यतिरिक्त आणखी काही गोड पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला ते एकदा नक्की करून पहावेसे वाटेल.

गाजराची खीर


गाजराची खीर ही एक अतिशय स्वादिष्ट डिश आहे, जी बनवायला अगदी सोपी आहे. गाजराची खीर गरमागरमही खाता येते, पण ती थंड केल्यावर अधिक चवदार लागते.

Gajarachi Kheer: घरच्या घरी झटपट तयार करा गाजराची खमंग खीर - how to make carrot kheer at home in marathi | Maharashtra Times
गाजराची खीर बनवण्याचे साहित्य-

गाजर - 2 मध्यम
बदाम – 10 ते 15

दूध - 2 कप

कंडेस्ड मिल्क – 4 ते 5 चमचे

वेलची पावडर - 1 चिमूटभर

केशर – 1 चिमूटभर

तूप - 1 टिस्पून

काजू – 5 ते 6

पिस्ता – 5 ते 6

गाजर खीर तयार करण्याची पद्धत-

प्रथम गाजर चांगले धुवून सोलून घ्या आणि नंतर अर्धा कप पाणी टाकून कूकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

आता गॅस बंद करा आणि गाजर थंड होण्यासाठी ठेवा.

आता बदाम साध्या पाण्यात 1 तास किंवा गरम पाण्यात 15 मिनिटे भिजवून ठेवा. नंतर बदाम सोलून घ्या.

गाजर थंड झाल्यावर, गाजर आणि बदाम मिक्सरमध्ये एकत्र करुन त्याची पेस्ट बनवा.

ते मिक्स करताना थोडेसे पाणी घालायचे लक्षात ठेवा, जेणेकरून त्याची चांगली पेस्ट तयार होईल. आता गाजर बदामाची पेस्ट बाजूला ठेवा.

आता एका जड पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात काजू, पिस्ता घालून काजू हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.

आता तुपातून काजू आणि पिस्ते काढून बाजूला ठेवा.

त्याच पातेल्यात उरलेल्या तुपात गाजर बदामाची पेस्ट घालून मध्यम आचेवर 5 मिनिटे किंवा गाजराचा कच्चा वास निघेपर्यंत तळा.

आता पॅनमध्ये दूध घाला, चांगले मिसळा आणि दूध उकळू द्या.

या दरम्यान, दूध वारंवार ढवळत राहा.
दुधाला उकळी येऊ लागली की त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मिक्स करा.

तसेच त्यात वेलची पूड, केशर टाका आणि आणखी 5 मिनिटे खीर थोडी घट्ट होईपर्यंत उकळू द्या.

आता गॅस बंद करा. भाजलेले काजू आणि पिस्त्याचे तुकडे घालून त्याचे चांगले मिश्रण तयार करा.

तुमची गाजराची खीर तयार आहे.

सर्व्ह करण्यापूर्वी खीर थंड होऊ द्या आणि आणखी काही बदाम, पिस्त्यांनी ती सजवा.


गाजराचे लाडू


पिठापासून नारळापर्यंतचे लाडू तुम्ही खाल्ले असतीलच. पण हिवाळ्यात एकदा गाजराचे लाडूही चाखून पाहा. त्यांची मजा काही औरच आहे.

Gajar Ka Ladoo Recipe: How to make Gajar Ka Laddoo Recipe for Diwali at Home | Homemade Gajar Ka Laddoo Recipe - Times Food


गाजराच्या लाडूसाठी साहित्य-

1 कप किसलेले गाजर

1 टीस्पून गरम केलेले तूप

1/3 कप कंडेन्स्ड मिल्क

1 टीस्पून चिरलेला पिस्ता


गाजराचा लाडू तयार करण्याची पद्धत-


एका जड पॅनमध्ये अर्धा चमचे तूप गरम करा.

आता त्यात किसलेले गाजर घालून मंद आचेवर तळून घ्या.

ते एकजीव होईपर्यंत आणि कच्चा वास निघून जाईपर्यंत तळत राहा. 
मंद आचेवर किमान 10 मिनिटे लागतील.

आता त्यात कंडेन्स्ड मिल्क टाका आणि थोडा वेळ शिजवा.

आता त्यात उरलेले तूप टाका आणि घट्ट मिश्रण तयार होईपर्यंत शिजवत रहा.

आता गॅस बंद करा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या.

मात्र, मिश्रण पूर्णपणे थंड होऊ नये, हे लक्षात ठेवा, अन्यथा लाडू तयार होणार नाहीत.

आता हातामध्ये थोडेसे मिश्रण घेऊन त्याचे छोटे लाडू बनवा.

प्रत्येक लाडूमध्ये काजू घाला.
तुमचे गाजराचे लाडू तयार आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी