Electric kettle । या सोप्या रेसिपी इलेक्ट्रिक किटलीत बनवा, लेट्स ट्राय

Electric kettle : इलेक्ट्रिक किटली ही आजच्या काळात प्रत्येक घराची गरज बनली आहे. मात्र, ही इलेक्ट्रिक किटली नुसती पाणी गरम करण्यासाठी नाही तर त्यात अनेक प्रकारच्या पाककृतीही बनवता येतात.

Make this simple recipe in an electric kettle let's try
इलेक्ट्रिक किटलीतील सोप्या रेसिपी, तुम्हीही करुन पाहा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इलेक्ट्रिक किटलीत करा या सोप्या रेसिपी
  • पाणी गरम करण्यासोबतच ट्राय करा या रेसिपीज
  • झटपट नूडल्स, ओट्स, बनवा...

Electric kettle : इलेक्ट्रिक किटली ही आजच्या काळात प्रत्येक घराची गरज बनली आहे. साधारणपणे, महिलांना ते पाणी गरम करण्यासाठी वापरणे आवडते. त्याच वेळी, ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत, तेथे दूध देखील गरम केले जाते. काही स्त्रिया सकाळी लवकर उठल्यावर इलेक्ट्रिक किटलीत कॉफी बनवतात. महिलांना कॉफी बनवण्यापासून ते दूध गरम करण्यापर्यंत मदत होत असल्याने, महिलांना ती खरेदी करणे आणि वापरणे खूप आवडते.


मात्र, ही इलेक्ट्रिक किटली नुसती पाणी गरम करण्यासाठी नाही तर त्यात अनेक प्रकारच्या पाककृतीही बनवता येतात. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण ते खरं आहे. अनेक सोप्या रेसिपी फक्त इलेक्ट्रिक किटलने बनवता येतात.या अर्थाने, ते तुमचा स्वयंपाक करण्याची वेळ देखील मोठ्या प्रमाणात कमी करते आणि त्रासमुक्त करते. म्हणून आज या लेखात आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक किटलीमध्ये बनवलेल्या काही सोप्या रेसिपींबद्दल सांगत आहोत, 
ज्या तुम्ही स्वत: अगदी सहज ट्राय करू शकता


झटपट नूडल्स

7 iconic instant noodles from around the world | The Times of India

जेव्हा तुम्हाला हलकी भूक लागते पण स्वयंपाक करायला आवडत नाही . तेव्हा सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे मॅगीसारखे झटपट नूडल्स बनवणे. पण जर तुम्हाला ते अगदी सोप्या पद्धतीने बनवायचे असेल तर अशावेळी तुम्ही इलेक्ट्रिक किटली वापरा. तुम्हाला फक्त 1 कप पाणी इलेक्ट्रिक किटलमध्ये ठेवावे लागेल आणि ते चालू करावे लागेल. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मॅगी आणि टेस्टमेकर एकत्र करा.
मग इलेक्ट्रिक किटली पुन्हा चालू करा. नूडल्स काही मिनिटे शिजवा जेणेकरून ते चांगले शिजतील. तुमचे गरमागरम इन्स्टंट नूडल्स तयार आहेत. 
तुम्हाला हवे असल्यास पाण्याला उकळी आल्यानंतर चिरलेल्या भाज्याही घालू शकता. ते पाण्यात ब्लान्च होईल. दुसरीकडे, जर तुम्हाला सूपी नूडल्स आवडत असतील तर तुम्ही त्यात थोडे जास्त पाणी घालू शकता.

ओट्स बनवा

Can we eat oats at night? | The Times of India

जर तुम्हाला कमी वेळेत हेल्दी ब्रेकफास्ट बनवायचा असेल तर ओट्स बनवणे ही चांगली कल्पना आहे. पण गॅससमोर उभं राहून तुमचा वेळ वाया घालवायचा नसेल तर इलेक्ट्रिक किटलीची मदत घ्या. इलेक्ट्रिक किटलीमध्ये ओट्स सहज बनवता येतात. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे एक कप पाणी किंवा दूध इलेक्ट्रिक किटलीत ठेवा. आता त्यात अर्धा कप ओट्स घालून मिक्स करा. त्यात बिया काढून टाकल्यानंतर खजूर देखील घालू शकता जेणेकरून ओट्स थोडे गोड होतील. आता ओट्स 6-8 मिनिटे किंवा पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा. ते शिजल्यावर, सफरचंद, स्ट्रॉबेरी, केळी इत्यादी चिरलेल्या फळांनी ओट्स सजवा आणि सर्व्ह करा.

अंडी उकडा

Do you know about these 5 benefits of eating boiled eggs? | The Times of  India

बर्‍याच लोकांना नाश्त्यात उकडलेले अंडे खायला आवडते. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल, तर माझ्यावर विश्वास ठेवा की इलेक्ट्रिक किटली तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्हाला फक्त इलेक्ट्रिक किटलमध्ये थोडे पाणी ठेवावे लागेल, ते चालू करा आणि उकळू द्या. आता त्यात अंडी घाला. आता इलेक्ट्रिक किटली पुन्हा चालू करा. अंडी शिजेपर्यंत पाणी उकळू द्या. मग इलेक्ट्रिक किटली बंद करा आणि अंडी बाहेर काढा नीट स्कीन काढून घ्या. आता त्यांना मधोमध कापून घ्या. मीठ आणि मिरपूड भुरभुरवा.. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी