unisex condom जगातील पहिला युनिसेक्स कंडोम बाजारात दाखल

Malaysian company unveils first unisex condom, may be available online from December जगातील पहिला युनिसेक्स कंडोम बाजारात दाखल झाला. हा कंडोम पुरुष आणि महिला दोघेही वापरू शकतात. युनिसेक्स कंडोमच्या मदतीने सुरक्षित सेक्स करणे शक्य आहे.

Malaysian company unveils first unisex condom, may be available online from December
जगातील पहिला युनिसेक्स कंडोम बाजारात दाखल 
थोडं पण कामाचं
  • जगातील पहिला युनिसेक्स कंडोम बाजारात दाखल
  • भारतीयांसाठी हा कंडोम लवकरच ऑनलाइन उपलब्ध होईल
  • पुरुष आणि महिला दोघेही वापरू शकतात युनिसेक्स कंडोम

Malaysian company unveils first unisex condom, may be available online from December नवी दिल्ली: जगातील पहिला युनिसेक्स कंडोम बाजारात दाखल झाला. हा कंडोम पुरुष आणि महिला दोघेही वापरू शकतात. युनिसेक्स कंडोमच्या मदतीने सुरक्षित सेक्स करणे शक्य आहे. मलेशियातील ट्विन कॅटेलिस्ट कंपनी (TWIN CATALYST SDN BHD) या कंडोमची निर्मिती करत आहे. वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोम (Wondaleaf Unisex Condom) असे या कंडोमचे नाव आहे. कंपनीसाठी काम करणाऱ्या स्त्री रोग तज्ज्ञांच्या पथकाने युनिसेक्स कंडोमसाठी संशोधन केले आहे. भारतीयांसाठी हा कंडोम लवकरच ऑनलाइन उपलब्ध होईल.

पुरुषांना कंडोम वापरुन जो फायदा होतो तोच फायदा महिला आणि पुरुष या दोघांना युनिसेक्स कंडोमच्या वापराने होईल. पुरुषांच्या लिंगाला (Penis) आणि महिलांच्या योनीला (Vagina) घट्ट चिकटून आवश्यक संरक्षण देण्यासाठी युनिसेक्स कंडोममध्ये एक सहज चिकटणाऱ्या कव्हरिंगचा वापर केला आहे. 

बाजारात आणण्याआधी युनिसेक्स कंडोमच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. हा कंडोम वापरुन महिला आणि पुरुषांनी घेतलेल्या अनुभवाची नोंद करुन दर्जेदार युनिसेक्स कंडोम विकसित केला आहे, असे कंपनीने सांगितले. वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोमच्या (Wondaleaf Unisex Condom) सुरक्षेबाबत आणि गुणवत्तेबाबत १०० टक्के खात्री असल्याचे कंपनीने सांगितले. लैंगिक आजार (sexually transmitted disease) आणि नको असलेल्या बाळंतपणापासून (unwanted pregnancy) संरक्षण देण्याची क्षमता वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोममध्ये असल्याचेही कंपनीने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी