लवकरच येतेय पुरूषांसाठी गर्भनिरोधक गोळी, जाणून घ्या कसा होईल उपयोग

तब्येत पाणी
Updated Jul 02, 2018 | 17:25 IST | IANS

प्रेग्नेंसी रोखण्यासाठी महिलांसाठी अनेक प्रकार आहेत. पण पुरूषांसाठी अनेक प्रकार नाहीत. कंडोम हा एकमेव ऑप्शन त्याच्याकडे असतो. पण आता पुरूषांनाही दुसरा ऑप्शन येत आहे. पुरूषांसाठी गर्भनिरोधक गोळी बाजारात येणार आहे. जाणून घ्या कसे काम करेल ही गोळी...

contraceptive pills for men
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Thinkstock

न्यूयॉर्क :  महिलांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या प्रमाणे आता पुरूषांसाठी अशा प्रकारची गोळी बाजारात उपलब्ध होणार आहे.  संशोधकांनी अशा प्रकारच्या गोळीचा शोध लावला आहे, जी शुक्राणूंच्या गतीशिलतेवर नियंत्रण ठेवू शकेल. यामुळे शुक्राणूंच्या गर्भधारण क्षमतेला कमी करू शकतो. या घटकाचा वापर करून पुरूषांसाठी निरोधक गोळी बनविता येणार आहे. यामुळे लोकसंख्या नियंत्रित राखण्यात मदत होऊ शकते.  ईपी०५५ नावाचा घटक शुक्राणूची गतिशिलता शिथिल करतो आणि हार्मोनवर कोणताही परिणाम होत नाही.

वैद्यकीय जनरल पीएलओएस वनमध्ये प्रकाशीत करण्यात संशोधनात दावा करण्यात आला आहे की या नवीन घटकद्वारे पुरूषांसाठी गोळी तयार करता येणार आहे. त्यामुळे जन्मदर नियंत्रित करण्यावर चांगला उपाय ठरू शकतो. याचे कोणतेही साइड इफेक्ट नाही आहे.  सध्या पुरूषांना कंडोम आणि नसबंदीचा उपाय आहे.

परिक्षणासाठी याचा उपयोग नर माकडांवर करण्यात आला. त्यात त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही.  अमेरिकेच्या ऑरगन हेल्थ अँड सायन्स युनिवर्सिटीतील ऑरगन नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या मेरी जेलिंस्कीने म्हटले की, या गोळीचा उपयोग केल्यानंतर १८ दिवसात सर्व माकडांमध्ये सुधारणा पाहिली गेली.

पुरूष गर्भनिरोधक गोळीवर अजून काम सुरू आहे. अजून स्पष्टपणे सांगण्यात येत नाही की ही गोळी कधी बाजारात येणार आणि भारतात ही कधी लॉन्च करणार याबाबतही स्पष्टता नाही. सध्या महिलांसाठी  बाजारात उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्या पाहिजे.

काही जण हे निष्काळजीपणे घेतला आणि त्याचे साइड इफेक्ट्स जाणवतात. महिलांनी आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी