पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू लहान, पण त्याचे फायदे आहेत महान

Brain Health: पुरुष आणि स्त्रिया यांच्यात सर्वात हुशार कोण आहे हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण ऑक्सफर्ड आणि केंब्रिजच्या संशोधकांनी या दोघांच्या मेंदूच्या आकाराच्या संदर्भात रंजक माहिती दिलीय.

male female brain size difference read health tips in marathi
पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू लहान, पण त्याचे फायदे आहेत महान (Photo: Pexels and BCCL) 

male brain vs female brain : मेंदूशिवाय माणूस कोणत्याही कामाचा नाही. त्यामुळे मेंदू हा अवयव खूपच महत्त्वाचा असून त्याच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पण पुरुष आणि महिला यांच्यात कोणाचा मेंदू मोठा आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? या संदर्भात केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन करत उत्तर दिलं आहे.

केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या संशोधनात एमआरआय सारख्या टेस्टच्या माध्यमातून महिला आणि पुरुषांच्या मेंदूच्या आकाराची तुलना केली आहे. या संशोधनात त्यांना आढळून आले की, पुरुषांचे ब्रेन वॉल्यूम हे महिलांच्या तुलनेत 8 ते 13 टक्क्यांनी अधिक आहे.

...म्हणून महिलांचा मेंदू लहान

संशोधनात असे समोर आले की, महिला आणि पुरुषांच्या मेंदूचा आकार हा शारीरिक रचनेवर अवलंबून असतो. साधारणपणे पुरुषांची उंची ही महिलांपेक्षा अधिक असते त्यामुळे त्यांच्या मेंदूच्या आकारावरही परिणाम होतो.

हे पण वाचा : या भाज्या खरेदी करायला जाल तर खिसा रिकामा कराल

महिलांना काय होतो फायदा?

अभ्यासात असे समोर आले की, Insular Cortex पुरुषांमध्ये अधिक असल्याचे आढळून आले. मेंदूचा हा भाग भावना, दृष्टीकोण, वृत्ती, जागरुकता यांच्याशी संबंधित आहे. याच कारणामुळे महिला जास्त भावनिक असू शकतात.

पुरुषांना काय होतो फायदा?

पुरुषांचे amygdalae मोठे असतात. मेंदूमधील हा भाग मोटर स्किल आणि जगण्याच्या भावनांशी संबंधित असल्याचं मानलं जातं. यामुळे पुरुषांचा आनंद, शारीरिक हालचाली, शिकण्याची क्षमता तसेच लक्षात ठेवण्याची क्षमता अधिक चांगली दिसते.

हे पण वाचा : गरोदरपणात मुळा खाण्याचे फायदे आणि नुकसान

महिलांना या आजारांचा धोका

नॉर्थ वेस्टर्ड मेडिसिननुसार, महिलांना डिप्रेशन, अल्झायमर, मल्टिपल स्केलेरोसिस आणि स्ट्रोक यासारख्या आजारांचा धोका अधिक असतो. 

पुरुषांना कोणता धोका?

पुरुषांना जाणवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा धोका वेगवेगळा असतो. त्यांना दारूचे व्यसन, पार्किन्सनचा धोका जास्त असतो.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी