Men’s health: महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त गंभीर असतात ‘हे’ आजार, वेळीच व्हा सावध

शारीरिक रचनेमुळे, लाईफस्टाईलमुळे आणि आपल्या समाजव्यवस्थेमुळेही काही आजारांचा परिणाम हा स्त्रियांपेक्षाही पुरुषांवर अधिक होत असल्याचं दिसतं. पुरुषांची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप यासारख्या गोष्टींचा परिणामही त्यावर होत असतो.

Men’s health
महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त गंभीर असतात ‘हे’ आजार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काही आजार महिलांपेक्षा पुरुषांना होण्याची जास्त शक्यता
  • लाईफस्टाईल आणि नैसर्गिक रचनेचाही होतो परिणाम
  • शेअरिंगच्या सवयीअभावी जडतात अनेक मानसिक आजार

Men’s health: पुरुष आणि महिला (Men and women) यांच्या शरीरात काही नैसर्गिक वेगळेपणा (Natural difference) असतो. त्यामुळे काही आजारांच्या बाबतीत पुरुषांना महिलांपेक्षा अधिक धोका (More prone) असल्याचं दिसून येतं. शारीरिक रचनेमुळे, लाईफस्टाईलमुळे आणि आपल्या समाजव्यवस्थेमुळेही काही आजारांचा परिणाम हा स्त्रियांपेक्षाही पुरुषांवर अधिक होत असल्याचं दिसतं. पुरुषांची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप यासारख्या गोष्टींचा परिणामही त्यावर होत असतो. जाणून घेऊया, असे कुठले आजार असतात, जे पुरुषांना महिलांच्या तुलनेत जास्त त्रासदायक ठरू शकतात. 

डिप्रेशन

महिला या पुरुषांपेक्षा मानसिकरित्या हळव्या असतात, असं नेहमीच सांगितलं जातं. मात्र महिलांच्या तुलनेत पुरुष हे डिप्रेशनला अधिक लवकर बळी पडत असल्याचं दिसून येतं. आपल्याकडे महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक बोलक्या असतात. आपल्या भावभावना, सुखदुःखं इतरांशी शेअर करणं महिलांना अधिक सहजरित्या जमतं. त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य पुरुषांच्या तुलनेत चांगलं असतं. पुरुष मात्र आपली दुःखे लपवण्यात धन्यता मानताना दिसतात. त्यामुळे मनातील नकारात्मक गोष्टींचा निचरा न होता तो साठत जातो. परिणामी डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांना पुरुषांना सामोरं जावं लागतं. 

हृृदयरोग

हृदयाशी संबंधित आजारांचे रुग्ण हे महिलांपेक्षा पुरुष अधिक असल्याचं दिसून आलं आहे. हार्ट डिसिज हा काही बाबतीत लाईफस्टाईल डिसिजही आहे. पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत कोलेस्ट्रॉल अधिक असल्याचंही दिसून येतं. त्यामुळे हार्टशी संबंधित त्रास पुरुषांना अधिक होतो. 

अधिक वाचा - Healthy Drink, Turmeric Tea Benefits : थंडीत हळदीचा गुणकारी चहा प्या, रोगप्रतिकारक क्षमता वाढवा

मधुमेह

महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त गोड आणि तेलकट पदार्थ खात असल्याचं दिसतं. विशेषतः घराबाहेर पडल्यानंतर अधिकाधिक हॉटेलिंग करणे, बाहेरच्या चमचमीत पदार्थांवर ताव मारणे हे प्रकार महिलांच्या तुलनेत पुरुषांकडून जास्त प्रमाणात होत असतात. त्याचा परिणाम पुरुषांच्या आरोग्यावर होतो आणि मधुमेहासारखे आजार त्यांना लवकर जडतात. त्यासाठी हेल्दी फूड खाणे, बाहेरचे पदार्थ कमी खाणे, आहारातून गोड आणि तेलकट पदार्थ कमी कऱणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यायाम कऱणे आवश्यक असते. 

अधिक वाचा - Heart failure and sex: हार्टचा त्रास असणाऱ्यांसाठी सेक्स करणं किती सुरक्षित? वाचा सविस्तर

यकृताचे विकार

पुरुषांच्या लाईफस्टाईलचा विचार करता महिलांच्या तुलनेत मद्यपान करणारे पुरुष हे अधिक आढळतात. महिलाही मद्यपान करत असल्या तरी त्यांच्या तुलनेत पुरुषांकडून केलं जाणारं मद्यपान हे अधिक असतं. लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करता मद्यपान करणाऱ्या पुरुषांची संख्या अधिक असल्यामुळे यकृताची संबंधित विकार पुरुषांना जास्त प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं. 

फुफ्फुसं बिघडणे

महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात स्मोकिंग करत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे पुरुषांना फुफ्फुसाचे आजार जडण्याची शक्यता अधिक असते. त्याशिवाय इतरही अनेक कारणांनी फुफ्फुसाचे विकार जडायला सुरुवात होते. 

डिस्क्लेमर - सामान्यज्ञानाच्या आधारे ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असेल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी