Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी आंब्याची पाने म्हणजे एक वरदानच; आजच करा डाएटमध्ये समावेश 

Diabetes । डायबिटीजच्या रूग्णांसाठी आंबा नाही तर आंब्याची पाने अतिशय उपयुक्त आहेत. याचा वापर केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दरम्यान आता जून उजाडला आहे तरी देखील उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे सर्वचजण आंब्याचा स्वाद घेत आहेत.

Mango leaves are extremely beneficial for diabetics
डायबिटीजच्या रूग्णांसाठी आंब्याची पाने म्हणजे एक वरदानच  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डायबिटीजच्या रूग्णांसाठी आंब्याची पाने अतिशय उपयुक्त आहेत.
  • आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळते.
  • ज्यांची दृष्टी कमी आहे ते देखील आंब्याच्या पानांचे सेवन करू शकतात.

Diabetes । मुंबई : डायबिटीजच्या रूग्णांसाठी आंबा नाही तर आंब्याची पाने अतिशय उपयुक्त आहेत. याचा वापर केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दरम्यान आता जून उजाडला आहे तरी देखील उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे सर्वचजण आंब्याचा स्वाद घेत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आंब्याची पाने डायबिटीजसाठी अत्यंत फलदायी आहेत. चला तर मग जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर कसा करायचा. (Mango leaves are extremely beneficial for diabetics). 

आंब्याच्या पानांमध्ये असतात हे गुण 

आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळते, जे डायबिटीज आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणजेच ज्यांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या आहे ते देखील याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी देखील हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. ज्यांची दृष्टी कमी आहे ते देखील आंब्याच्या पानांचे सेवन करू शकतात. याच्या सेवनाने दृष्टी वाढण्यास देखील मदत होते.

अधिक वाचा : आतापर्यंत १४ फलंदाजांनी कसोटीत गाठला १० हजार धावांचा टप्पा

आंब्याच्या पानांचा असा करा वापर 

आंब्याच्या पानांचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम १० ते १५ पाने घ्यावीत. नंतर ती पाण्यात व्यवस्थित उकळून घ्यावीत. त्यांना रात्रभर असेच ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्या. लक्षणीय बाब म्हणजे ही सर्व क्रिया रिकाम्यापोटी करायची आहे. असे नियमित केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

तोंडली देखील डायबिटीजसाठी प्रभावी 

  1. डायबिटीजला नियंत्रित ठेवते - डायबिटीज ग्रस्त रुग्णांना खूप जपून आहार घ्यावा लागतो. आहारातील हलगर्जीपणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लगेच वाढू लागते. अशा परिस्थितीत डायबिटीजच्या रुग्णांनी तोंडलीच्या भाजीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. तोंडलीमध्ये अँटी-हायपरग्लाइसेमिक प्रभाव असतो, जो रक्तातील साखरेची वाढलेली पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.
  2. लठ्ठपणापासून सुटका होते - तोंडली ही फायबरने समृद्ध असलेली भाजी आहे. ती खाल्ल्याने वजन सहज नियंत्रित करता येते. तोंडली खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते. यामध्ये फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही डाएटवर असाल तर तोंडलीच्या भाजीचा तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.
  3. प्रतिकारशक्ती वाढवते - तोंडलीमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. तोंडलीच्या भाजीचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. कुंदरू प्रतिकारशक्ती मजबूत आणि शरीराराला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी मदत करते. 
  4. संसर्गापासून दूर ठेवते - तोंडलीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे तुम्हाला संसर्गापासून वाचवतात. याशिवाय तोंडलीध्ये आयरन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात आढळते. जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी