Mango Leaves Benefits : आंब्याच्या पानांचे असतात आश्चर्यकारक फायदे...मधुमेहापासून कोलेस्ट्रॉलपर्यत सर्वत्र उपयुक्त

Health : आंब्याचे झाड हे आपल्याकडे सहजपणे उपलब्ध असणारे मात्र तितकेच महत्त्वाचे असणारे झाड आहे. आंब्यासारखे गोड, रसाळ फळ प्रत्येकालाच आवडते. मात्र त्याचबरोबर आंब्याच्या पानांचा (Mango Leaves)वापर अनेक सण, विधींमध्येदेखील केला जात असतो. त्याचबरोबर आंब्यांच्या पानांचे औषधीयदृष्ट्या देखील महत्त्व असते.आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे मधुमेह (Diabetes) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित करण्यास मदत करतात.

Mango Leaves Benefits
आंब्याच्या पानांचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • आंब्याचे झाड हे आपल्या परंपरेत अत्यंत महत्त्वाचे झाड आहे
  • आंब्याच्या पानाचे अनेक फायदे असतात
  • आंब्याची पाने मधुमेह (Diabetes) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित करण्यासदेखील उपयुक्त असतात.

Mango Leaves Benefits : नवी दिल्ली : आंब्याचे झाड हे आपल्याकडे सहजपणे उपलब्ध असणारे मात्र तितकेच महत्त्वाचे असणारे झाड आहे. आंब्यासारखे गोड, रसाळ फळ प्रत्येकालाच आवडते. मात्र त्याचबरोबर आंब्याच्या पानांचा (Mango Leaves)वापर अनेक सण, विधींमध्येदेखील केला जात असतो. त्याचबरोबर आंब्यांच्या पानांचे औषधीयदृष्ट्या देखील महत्त्व असते.आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे मधुमेह (Diabetes) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणजेच ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे ते देखील याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचे आहे ते देखील हे करून पाहू शकतात. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. ज्यांची दृष्टी कमकुवत झाली आहे ते देखील आंब्याच्या पानांचे सेवन करू शकतात. आंब्याच्या  याच्या सेवनाने दृष्टी वाढण्यास मदत होते. (Mango Leaves have many benefits, useful in controlling blood sugar)

अधिक वाचा : Kidney Disease: चोर पावलाने येत आहेत किडनीच्या समस्या, वेळीच व्हा सावध आणि टाळा हे पदार्थ...

मधुमेही रुग्णांसाठी महत्वाचे

सध्या उन्हाळा असल्याने प्रत्येकाने आंबा खायला सुरुवात केली असेल, पण तुम्हाला माहित आहे का की त्याची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया रक्तातील साखर नियंत्रणात या फळाच्या पानांचा वापर कसा करायचा. अर्थात गंभीर रुग्णांनी ते घेण्यापूर्वी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अधिक वाचा : Dark Lips: या चुकांमुळे होतात ओठ काळे...दुर्लक्ष करू नका

आंब्याची पाने कशी वापरायची

सर्व रुग्णांना प्रथम 10-15 आंब्याची पाने घ्यावीत, नंतर ती पाण्यात व्यवस्थित उकळावीत. रात्रभर त्यांना असेच सोडा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करा. लक्षात ठेवा की ते रिकाम्या पोटी प्या. असे नियमित केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

शरीरातील कोलेस्ट्रॉल एका पातळीपेक्षा अधिक वाढणं हे शरीरासाठी नेहमीच धोकादायक असतं. कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील विविध अवयांवर विपरित परिणाम होतो आणि सर्वाधिक धोका हृदयाला निर्माण होतो. जर शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचीदेखील शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणं आणि त्यात सुधारणा कऱण्याची गरज असते.

अधिक वाचा : Health Tips : पावसाळ्यात झपाट्याने पसरतात डेंग्यू-मलेरिया, या छोट्या गोष्टींनी करा बचाव

जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल तर तुम्हाला आयुष्यभर सतर्क राहण्याची गरज आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि जीवनशैलीची खूप काळजी घ्यावी लागेल. जास्त वेळ उपाशी राहणं देखील योग्य नाही. तसेच जेवण्यात प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. याशिवाय गोड पदार्थ (Sweets)अजिबात खाऊ नयेत. पण सणासुदीच्या काळात आपण कितीही नियंत्रण ठेवलं तरी थोडं गोड खाल्लं जातंच. त्यामुळे रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी वाढते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी