Cardiac Arrest: अनेक मोठ्या कलाकारांचा कार्डियक अरेस्ट घेतलाय जीव...

What Is Cardiac Arrest: आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यक्ती चांगले जीवन जगते. चांगला आहार घेतो. स्वतःला फिट ठेवते. असे असूनही असे अनेक आजार आहेत ज्यांची माणसाला नीट माहितीही नसते आणि तो आजार माणसाला आपल्या कवेत घेतो. असाच एक आजार म्हणजे कार्डियाक अरेस्ट, लोकांना त्याबद्दल फार कमी माहिती आहे आणि या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

many big artists have lost their lives due to cardiac arrest know how they can save the life of the patient
Cardiac Arrest: अनेक मोठ्या कलाकारांचा कार्डियक अरेस्ट घेतला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कार्डिअॅक अरेस्टमध्ये, एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक पंप करणे थांबवते
  • काही सेकंदात संपूर्ण शरीरावर परिणाम होतो आणि व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध पडते
  • काही मिनिटांत रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर त्याचा मृत्यू होतो.

Cardiac Arrest Symptoms: कार्डियाक अरेस्ट ( cardiac arrest) हा एक असा आजार आहे ज्याची फार काही लक्षणं आढळून येत नाही. याच कार्डियाक अरेस्टने आतापर्यंत अनेक बड्या कलाकारांचा मृत्यूही झाला आहे. नुकतंच प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) याला देखील कार्डियाक अरेस्ट  आला होता. ज्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार्डियाक अरेस्टमध्ये, एखाद्या व्यक्तीचे हृदय (Heart) अचानक पंप करणे थांबवते आणि यामुळे हृदय, मेंदू, फुफ्फुस आणि इतर अवयवांच्या कामावर परिणाम होतो. काही सेकंदात त्याच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो आणि व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध पडते. कधी-कधी ते जीवघेणेही ठरते. (many big artists have lost their lives due to cardiac arrest know how they can save the life of the patient)

कार्डियाक अरेस्ट आल्यानंतर काही मिनिटांत रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर त्याचा मृत्यूही होतो. हृदयविकाराच्या झटक्याने जीवन आणि मृत्यू यातील फरक फक्त ५ मिनिटांचा असतो. या ५ मिनिटात व्यक्तीला योग्य उपचार मिळाले तर त्याच्या जीवावरचा धोका टळू शकतो. कार्डिअॅक अरेस्टची लक्षणे आणि या आजारापासून एखाद्या व्यक्तीचा जीव कसा वाचवता येईल ते जाणून घेऊया.

अधिक वाचा: 10,000 Steps Workout: वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाने १० हजार पावलं चाललं पाहिजे? जाणून घ्या सत्य

कार्डियाक अरेस्टची लक्षणे

कार्डियाक अरेस्ट लक्षणं ही तात्काळ आणि जोरदार असतात. यामध्ये ती व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते. श्वास थांबतो आणि छातीत अस्वस्थता वाटू लागते. हृदयाचे ठोके अचानक वाढू लागतात. अशी लक्षणं दिसताच संबंधित व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अशा प्रकारे वाचू शकतो रुग्णाचा जीव

जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल, तर त्याला ताबडतोब सीपीआर म्हणजेच लाईफ सेव्हिंग टेक्निक द्यावे. यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत, व्यक्तीला तात्काळ सीपीआर किंवा वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. CPR साठी, आधी बेशुद्ध व्यक्तीला सरळ झोपायला लावा. यानंतर, तुम्ही दोन्ही हात त्याच्या छातीच्या मध्यभागी ठेवून एका मिनिटात 100 वेळा कॉम्प्रेस करा. रुग्णवाहिका येईपर्यंत आणि व्यक्तीला रुग्णालयात नेले जाईपर्यंत तुम्ही CPR देणे सुरू ठेवा. असे केल्याने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. अनेक वेळा असे केल्याने व्यक्ती शुद्धीवरही येते.

अधिक वाचा: Health Tips : प्रत्येक पिझ्झा 7.8 मिनिटांनी आयुष्य करतो कमी, या गोष्टी खाणं लगेच बंद करा

कार्डियाक अरेस्ट टाळण्याचे मार्ग

कार्डियाक अरेस्ट टाळण्यासाठी तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहणे आवश्यक आहे. चांगला आणि पौष्टिक आहार घ्यावा. गोड आणि तेलकट पदार्थ टाळावेत. याशिवाय तुम्ही मद्यपान आणि धुम्रपान यासारख्या गोष्टींचे सेवन करत असाल तर लगेच सोडून द्या.

(टीप: या लेखातील टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. त्याला व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून समजू नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी