Heart disease : जगभरात विविध प्रकारचे आजार आहेत. त्याच दरम्यान विविध प्रकारचे रोग, संसर्ग सुद्धा येतात. गेल्या काही वर्षांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. पण जगातील सर्वाधिक मृत्यू होण्यामागचं कारण हे कोरोना नाही तर वेगळंच आहे. सर्वाधिक मृत्यू कोणत्या आजाराने होत असतील तर त्याचं उत्तर म्हणजे हृदयरोग आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील सर्वात मोठा किलर इस्केमिक हार्ट डिसीज (हृदयरोग) आहे. जो जगातील एकूण मृत्यूंपैकी 16 टक्के मृत्यू हे या आजारामुळेच होतात. 2000 सालापासून 2019 पर्यंत या आजाराने 8.9 मिलियनहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्याचं सर्वात मोठे कारण असलेल्या हृदयरोगाची लक्षणे काय आहेत आणि यापासून तुम्ही स्वत:चे संरक्षण कसे कराल? जाणून घ्या.
हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा
इस्केमिक हार्ट डिसीजला कोरोनरी हार्ट डिसीज (Coronary Heart Disease) किंवा धमनी रोग म्हटलं जातं. यामध्ये हृदयाच्या मासपेशींना मिळणारे रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि हृदय काम करणं बंद करतं.
हे पण वाचा : झटपट नोकरी बदलावी की नाही?
या आजाराचं सर्वात मोठं कारण म्हणजे, हृदयापर्यंत जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा आहे. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रीय नसल्याने वाईट चरबी शिरांमध्ये जमा होते ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात.
हृदयविकारांची सुरुवात ही हाय कोलेस्ट्रॉलमुळे होते आणि हृदयविकाराचा झटका, पक्षाघात याच्याशी संबंधित अनेक आजारांचे मुख्य कारण आहे. चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन केल्याने, मद्यपान केल्याने किंवा धूम्रपान करणे ही सुद्धा कारणे आहेत.
हे पण वाचा : रात्री इनरवेअर घालून झोपावे की नाही?
हृदयविकाराची लक्षणे सर्वांमध्येच दिसून येतात असे नाही. पण अनेकदा परिस्थिती गंभीर झाल्यावर ही लक्षणे दिसून येतात. हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचे मुख्य कारण म्हणजे हृदयविकाराचा झटका आहे. एका रिपोर्टनुसार, एका महिन्यापूर्वी तुम्हाला तीन लक्षणे जाणवू शकतात. यामध्ये थकवा (विश्रांतीनंतरही दूर होत नाही), खराब झोप आणि धाप लागणे या लक्षणांचा समावेश आहे.
हे पण वाचा : खजूर खाल्ल्याने आरोग्याला होतात तुफान फायदे
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)