Winter health tips: 99% लोकांना माहित नसते व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश किती वाजता आणि किती वेळ घ्यावा...जाणून घ्या

Health Tips : हिवाळ्यात थंडी वाढू लागली की आपण उन्हाच्या दिशेने धाव घेऊ लागतो. कारण त्यातून थंडीपासून आराम मिळतो. अशावेळी एकाचवेळी दोन फायदे होतात. एकतर थंडीपासून बचाव आणि दुसरा व्हिटॅमिन डी मिळते. खूप जास्त वेळ उन्हात बसलो की आपल्याला व्हिटॅमिन डी तितकेच जास्त प्रमाणात मिळते असे नाही. त्यामुळे नेमके कोणत्या वेळी सूर्यप्रकाशात बसावे हे समजून घ्या.

Vitamin D
व्हिटामिन डी  
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात थंडी वाढू लागली की आपण उन्हाच्या दिशेने धाव घेतो
  • व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून मिळते.
  • कधी आणि किती वेळ सूर्यप्रकाश घ्यावा

Which is the best time for vitamin D from sunlight:नवी दिल्ली : आपल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या सर्वांना हे माहिती असते की व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून (Sun light) मिळते. एरवी आपण उन्हापासून दूर पळतो. मात्र हिवाळ्यात थंडी वाढू लागली की आपण उन्हाच्या दिशेने धाव घेऊ लागतो. कारण त्यातून थंडीपासून आराम मिळतो. अशावेळी एकाचवेळी दोन फायदे होतात. एकतर थंडीपासून बचाव आणि दुसरा व्हिटॅमिन डी मिळते. मात्र दिवसाच्या कोणत्या वेळी (Correct time for sun bath) उन्हात बसल्यास फायदा होतो हे तुम्हाला माहित आहे का? बरं खूप जास्त वेळ उन्हात बसलो की आपल्याला व्हिटॅमिन डी तितकेच जास्त प्रमाणात मिळते असे नाही. त्यामुळे नेमके कोणत्या वेळी सूर्यप्रकाशात बसावे, किती वेळ बसावे जेणेकरून व्हिटॅमिन डी चा फायदा होईल याबद्दल जाणून घेऊया. (Many people does not which is the correct time for sun bath toget maximum vitamin D read in Marathi)

अधिक वाचा - मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला तांत्रिकनं फेवीक्विकनं चिपकवलं, नंतर घेतला जीव


व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती? (Best time for sun bath)

 
सकाळची वेळ
व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळची वेळ. जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजेच्या दरम्यान सूर्यप्रकाश घेऊ शकता. बरे किती वेळ उन्हात बसावे तर 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशात बसल्याने यावेळी व्हिटॅमिन डी चांगले उपलब्ध होते.

संध्याकाळची वेळ
सकाळच्या वेळी तुम्हाला शक्य न झाल्यास तुम्ही संध्याकाळच्या वेळी सूर्यप्रकाशात बसू शकता. यातूनदेखील तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकेल. कोणत्या वेळी सूर्यप्रकाशात बसायचे तर तुम्हाला हे जीवनसत्व सूर्यास्ताच्या वेळी मिळू शकते.

अधिक वाचा - Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना मिळाली बहीण प्रियंकाची साथ, मध्यप्रदेशातील सहभागामुळे ‘ही’ चर्चा सुरू

सूर्यप्रकाश अंगावर घेण्याचे फायदे 

व्हिटॅमिन डी
हे एक अतिशय महत्त्वाचे जीवनसत्व आहे. सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे व्हिटॅमिन डी आहे. अलीकडे अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. याशिवाय ते आपल्या शरीरालाही ऊर्जावान ठेवण्यासाठीही उपयुक्त असते.

अधिक वाचा - Death while having sex: मोलकरणीसोबत सेक्स करताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पोस्टमॉर्टेममधून समोर आले सत्य

सूर्यप्रकाशातील UVA

सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA मिळते. याचा फायदा होत आपला रक्तप्रवाह सुधारतो. फक्त एवढेच नाही तर  रक्तातील ग्लुकोजची पातळीही सुधारते आणि आपल्याला ऊर्जा मिळते.

चांगली झोप
अनेकांना झोपेची समस्या असते. त्यांना शांत झोप येत नाही. अशांसाठी सूर्यप्रकाश तुमच्यासाठी खूप उपयुक्त असतो. कारण यामुळे तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत होते. सूर्यप्रकाशामुळए आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होण्यास मदत होते. यातून तुम्हाला गाढ झोप येते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी